Shivsena : माथेरानच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, उद्धव ठाकरेंचं समर्थन केल्यामुळे मारहाण; आरोपी मोकाट

शिंदे गट आणि शिवसेना असे दोन ग्रुप तयार झाल्यापासून आरोप-प्रत्योरोप असे सुरु आहेत. त्यातून हा प्रकार घडला असावा अशी पोलिसांना शंका आहे. काही दिवसांपूर्वी सावंत यांना मारहाण केली होती. अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

Shivsena : माथेरानच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, उद्धव ठाकरेंचं समर्थन केल्यामुळे मारहाण; आरोपी मोकाट
माथेरानच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, उद्धव ठाकरेंचं समर्थन केल्यामुळे मारहाण; आरोपी मोकाट Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:12 AM

माथेरान – माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत (Pramod Sawant) यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सावंत यांना रविवारी फोनवरून ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी सावंत यांनी माथेरान पोलीस (Matheran Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. या आगोदर देखील उद्धव ठाकरेंना समर्थन दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. काल आलेल्या कॉलमध्ये मागच्यावेळी सोडलं, यावेळी कर्जतमध्ये (Karjat) आल्यास जीवे मारु अशी धमकी अज्ञाताने फोन करुन दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेत्या नेत्याने थेट पोलिस स्टेशन गाठलं आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट फुटल्यापासून शिवसेनेचे दोन ग्रुप तयार झाले आहेत. त्यातून हा प्रकार तयार झाला आहे.

उद्धव ठाकरेंचं समर्थन केल्यामुळे मारहाण

शिवसेनेत उठाव झाल्यानंतर माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिले होते. तसच कर्जतचे बंडखोर शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा फोटोही त्यांनी माथेरानच्या शिवसेना शाखेतून काढला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रसाद सावंत हे कर्जतला गेलेले असताना अज्ञातांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला होता. यातून केवळ दैव बलवत्तर म्हणून सावंत वाचले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला असून हल्ल्यातील जवळपास 8 ते 10 आरोपी हे अजूनही फरार आहेत. दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले प्रसाद सावंत हे सध्या माथेरानमधील घरी बेडरेस्टवर आहेत. रविवारी 31 जुलै रोजी त्यांना एका नंबरवरून फोन आला. हिंदीत बोलत असलेल्या फोन करणाऱ्या इसमाने सावंत यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तुझी नेतागिरी माथेरानमध्येच कर, कर्जतमध्ये आला, तर मागच्या वेळी फक्त मारहाण करून सोडलं. पण यावेळी जीवे मारू, अशी थेट धमकी फोन करणाऱ्या इसमाने दिली. याप्रकरणी सावंत यांनी माथेरान पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सावंत यांच्यावरील हल्ल्यातले बहुतांशी आरोपी अद्याप मोकाट फिरत असून त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

दोन गट तयार झाल्याने वाद वाढला

शिंदे गट आणि शिवसेना असे दोन ग्रुप तयार झाल्यापासून आरोप-प्रत्योरोप असे सुरु आहेत. त्यातून हा प्रकार घडला असावा अशी पोलिसांना शंका आहे. काही दिवसांपूर्वी सावंत यांना मारहाण केली होती. अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.