‘आमच्यावर हिंदी लादू नका!’ हिंदीच्या कथित सक्तीच्या मुद्द्यावरुन स्टॅलिन यांचे मोदींना खडेबोल

MK Stalin on Hindu Language : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तेलंगणामध्ये दौरा होता. या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हे चेन्नईला पोहोचले. तिथे जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

'आमच्यावर हिंदी लादू नका!' हिंदीच्या कथित सक्तीच्या मुद्द्यावरुन स्टॅलिन यांचे मोदींना खडेबोल
नेमकं काय म्हणाले स्टॅलिन?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 7:36 AM

मुंबई : भाषेवरुन भारतात अनेकदा वेगवेगळे वाद होताना पाहायला मिळतात. त्यातही हिंदी भाषा (Hindi Language) ही सातत्यानं चर्चेत राहिली आहे. अशातच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री (Tamilnadu CM) एमके स्टॅलिन यांनी मोदींना (PM Narendra Modi) भाषेवरुन सुनावलंय. आमच्यावर हिंदू लादू नका अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांच्या हिंदीबाबतच्या कथित सक्तीवरुन स्टॅलिन यांनी निशाणा साधलाय. चेन्नईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलेत होते. ‘तमिळ भाषा ही देखील हिंदीच्या बरोबरीची आहे, असं समजा’ असं देखील स्टॅलिन यांनी यावेळी कार्यक्रमात म्हटलंय. तमिळ भाषेलाही हिंदीप्रमाणे अधिकृत दर्जा द्यावा, असंही त्यांनी म्हटलंय. यासोबत स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही विशेष मागण्यादेखील केल्यात. अजय देवगण आणि किचा सुदिप यांच्या झालेल्या हिंदी भाषेवरील ट्विटर वॉरनंतर स्लॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. दक्षिण भारतातून याआधीही हिंदी भाषेवरुन वाद झालेला आहेत. आता पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालंय.

नेमकं स्टॅलिन यांनी काय म्हटलं?

आमच्यावर हिंदी लादू नका! तमीळ भाषेलाही हिंदीच्या बरोबरीनेच समजा‘ असं वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तेलंगणामध्ये दौरा होता. या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी हे चेन्नईला पोहोचले. तिथे जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्टॅलिन यांनी हिंदी भाषेच्या कथित सक्तीच्या मुद्द्यावरुन मोदींना भर कार्यक्रमातच सुनावलंय. याशिवाय काही महत्त्वपूर्ण मागण्यादेखील केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

आणखी काय म्हणाले

तामिळनाडू राज्यातील मच्छिमारांना समुद्रात मुक्तपणे मासेमारी करता यावी यासाठी स्टॅलिन यांनी मोदींकडे महत्त्वाची मागणी केली. कचाथीवू हे श्रीलंकेतील बेट आणण्याची मागणी स्टॅलिन यांनी यावेळी केली. सोबत जीएसटीची रक्कम केंद्राने राज्याला द्यावी, हे सांगायलाही स्टॅलिन विसरले नाहीत. केंद्रीय जीएसीटीची सुमारे 14 हजार 6 कोटी रुपयांची थकबाकी द्यावी, अशा मागणी त्यांनी यावेळी केलं. त्याचप्रमाणे नीट परीक्षेत तामिळनाडूला विशेष सूट द्यावी, अशीही मागणी स्टॅलिन यांनी यावेळी केली.

पाहा व्हिडीओ :

हिंदी सक्तीचा विषय कुठून सुरु झाला?

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही, यावरुन अजय देवगण आणि कन्नड अभिनेचा किचा सुदीप यांच्या ट्वीटर वॉर रंगलं होतं. त्यानंतर हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आला होता. जर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता?, असं अजय देवगणने म्हटलं होतं. त्यानंतर ट्विटरचा उत्तर -प्रतिउत्तरे झाली होती. दोघांनी एकमेकांना अनेक उत्तरे दिली, स्पष्टीकरणही दिले होते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.