Deepak Kesarkar : भाजप-शिवसेना युतीचं घोडं नेमकं कुठे अडलं? दीपक केसरकरांची स्पष्टच सांगितलं! शरद पवारांवर निशाणा

भाजप शिवसेना युतीचं मानापमान नाट्य आहे. कुणी पुढाकार घ्यायचा यावर सगंळ अडलं असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय. केसरकर यांच्या दाव्यानं पुन्हा भाजप-शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरे सर्वकाही सोडून भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

Deepak Kesarkar : भाजप-शिवसेना युतीचं घोडं नेमकं कुठे अडलं? दीपक केसरकरांची स्पष्टच सांगितलं! शरद पवारांवर निशाणा
दीपक केसरकर, आमदारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 12:12 AM

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. त्यांच्या या निर्णयाचं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वागत केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच आहे, असं म्हटलंय. राष्ट्रपती निवडणुकीबाबत एनडीएची महत्वाची बैठक आज राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीला शिंदे गटाकडून दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) हजेरी लावली होती. या बैठकीनंतर मुंबईत दाखल झालेल्या दीपक केसरकरांनी खळबळजनक दावा केलाय. भाजप शिवसेना युतीचं मानापमान नाट्य आहे. कुणी पुढाकार घ्यायचा यावर सगंळ अडलं असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय. केसरकर यांच्या दाव्यानं पुन्हा भाजप-शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरे सर्वकाही सोडून भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

‘कुणी पुढाकार घ्यायचा यावर सगळं अडलंय’

दिल्लीहून परतल्यानंतर दीपक केसरकर म्हणाले की, भाजप-शिवसेना युतीचं मानापमान नाट्य सुरु आहे. कुणी पुढाकार घ्यायचा यावर सगळं अडलं आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ मानलं आहे. मोदींनी 370 हटवून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलंय. राम मंदिर हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते ही मोदींनी पूर्ण केलंय. आता फक्त फोन कुणी करायचा? यावर अडलं असल्याचा दावा केसरकरांनी केलाय.

‘शरद पवार यांनी चार वेळा शिवसेना फोडली’

केसरकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवार यांनी चार वेळा शिवसेना फोडली. छगन भुजबळ, राज ठाकरेंच्या वेळी पवारांनी शिवसेना फोडली असा गंभीर आरोप केसरकर यांनी केलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चॉईस एकनाथ शिंदे हेच होते. उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी नाईलाजास्तव करावी लागली होती, असंही केसरकर यांनी म्हटलंय.

जितेंद्र आव्हाडांचं केसरकरांना प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन केसरकरांवर निशाणा साधलाय. ‘अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका’ असा सूचक इशाराच आव्हाड यांनी केसरकरांना दिलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.