Shinde Government : कोकणात मंत्रिपदासाठी रस्सीखेच, सहा नावं चर्चेत

कोकणात मंत्रिपदासाठी चुरस

Shinde Government : कोकणात मंत्रिपदासाठी रस्सीखेच, सहा नावं चर्चेत
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 8:02 AM

मुंबई : राज्यात मोठ्या सत्ता संघर्षानंतर शिंदे सरकार सत्तेत आलं आहे. अश्यात आता बंडखोरी करून शिंदेची सोबत केलेल्या नेत्यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे. अश्यात आता कोकणात चुरस पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातून नितेश राणे आणि बंडखोर गटातील दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यात स्पर्धा आहे. तर रत्नागिरीत उदय सामंत (Uday Samant) आणि योगेश कदम या दोघांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर रायगडमधून भरत गोगावलेंना (Bharat Gogawale) मंत्रीपद निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. शिवाय प्रशांत ठाकूर यांचं नावही चर्चेत आहे. कोकणातील उदय सामंत तसंच दादा भुसे हे मंत्री शिंदे यांच्या गटाकडे आहेत. भुसे हे नाशिकचे असले तरी त्यांच्याकडे पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांना ही संधी पुन्हा मिळणार का? याकडे लक्ष आहे.

कोकणात मंत्रिपदासाठी चुरस

कोकणात चुरस पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातून नितेश राणे आणि बंडखोर गटातील दिपक केसरकर यांच्यात स्पर्धा आहे. तर रत्नागिरीत उदय सामंत आणि योगेश कदम या दोघांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर रायगडमधून भरत गोगावलेंना मंत्रीपद निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. शिवाय प्रशांत ठाकूर यांचं नावही चर्चेत आहे.कोकणातील उदय सामंत तसंच दादा भुसे हे मंत्री शिंदे यांच्या गटाकडे आहेत. भुसे हे नाशिकचे असले तरी त्यांच्याकडे पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांना ही संधी पुन्हा मिळणार का? याकडे लक्ष आहे.

ठाण्याला शिंदेकडून आशा

ठाण्याला पहिल्यांदा एकनाथ शिंदेच्या रुपाने मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मात्र या जिल्ह्यातही बंडखोर गटाकडून प्रताप सरनाईक आणि डॉ. बालाजी किणीकर यांच्या मंत्रिपदासाठी स्पर्धा आहे. तर भाजपकडून आमदार संजय केळकर मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.संजय केळकर, किसन कथोरे आणि रवींद्र चव्हाण या तीन नेत्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

औरंगाबादमध्ये स्पर्धा

औरंगाबादेत भाजप नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे आणि प्रशांत बंब हे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे एकट्या शिंदे गटाला औरंगाबादेतून तीन किंवा चार मंत्रिपदं मिळण्याची शक्यता कमीच आहे. असं असलं तरी संजय सिरसाट मात्र मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, शिंदे गटातील नेत्यांकडून त्यांची समजूत काढली जात असल्याची माहिती मिळतेय.

मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार?

नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, त्यात ऐनवेळी बदलही होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे.

अपक्षांना अधिकाधिक संधी

शिंदे गटासोबत तब्बल 11 अपक्ष आहेत. त्यात बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार आहे. तसेच इतर एक दोन अपक्षांना मंत्रिपद देऊन बाकीच्यांना महामंडळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.