AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर, अजितदादा निर्मळ मनाची व्यक्ती”, नववर्षानिमित्त दीपक केसरकर काय बोलले?

दीपक केसरकर यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं कौतुक केलंय. ते काय म्हणालेत? पाहुयात...

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर, अजितदादा निर्मळ मनाची व्यक्ती, नववर्षानिमित्त दीपक केसरकर काय बोलले?
| Updated on: Jan 01, 2023 | 10:15 AM
Share

शिर्डी : आजपासून 2023 हे वर्ष सुरु होतंय. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिर्डीत जात साईंचं दर्शन घेतलं. यावेळी केसरकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं तोंड भरून कौतुक केलंय. यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.

“उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर”

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. कटूता कमी करणं उद्धवजींच्या हातात आहे. मी त्यांचा आदर ठेवणारा मनुष्य आहे.उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलं नव्हतं, असं केसरकर म्हणाले आहेत.

जेव्हा घर पेटतं तेव्हा आधी आग विजवावी लागतं. कशामुळे लागली ते नंतर बघू .अगोदर आपण आपल घर सुरक्षित ठेवू या. असं मी उद्धवजींना बोललो होतो. मला ते बोलले त्याचं दु:ख वाटलं नाही. पण जे काही माध्यमांत दाखवलं गेलं त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या. असं काम होता कामा नये , प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये. मी सगळयांची उत्तर देईल, असंही केसरकर म्हणालेत.

“अजितदादा निर्मळ मनाची व्यक्ती”

अजितदादा पवार निर्मळ मनाचं व्यक्तीमत्व आहे. ते बाहेरून कठोर वाटत असले तरी त्यांचं मन निर्मळ आहे. अजीतदादा बोलताना फटकळ बोलतीत मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर त्यांच्यासारखा असावा, असं वाटतं, अशा शब्दात दीपक केसरकरांनी अजित पवारांचं कौतुक केलंय.

साईबाबांकडे काही मागण्याची गरज पडत नाही ते सर्व काही देतात. राज्यात सुख-समृद्धी नांदावी म्हणून साईं चरणी प्रार्थना केली, असं केसरकर म्हणालेत.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.