Eknath Shinde : “होय आमचं ईडीचं सरकार”, दीपक केसरकरांचं विधान, वाचा सविस्तर…
Deepak Kesarkar : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यात नव्याने स्थापित झालेलं शिंदे सरकार ईडीचं सरकार असल्याचं म्हटलंय.
मुंबई : ईडीच्या धाकाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं वारंवार बोललं जात असताना आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी “होय आमचं ईडीचं सरकार”, असं म्हणत या विधानाला दुजोरा दिला आहे. पण त्या मागचा तर्कही त्यांनी सांगितला आहे. “होय आमचं खरंच ईडीचं सरकार आहे. पण ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावातली इंग्रजी आद्याक्षरे आहेत. शिंदेंच्या नावातील E आणि फडणवीसांच्या नावातील D म्हणजेच ED”, असं केसरकर यांनी म्हटलंय. याशिवाय संजय राऊतांच्या ईडी चौकशीवरही त्यांनी भाष्य केलंय. “आमचं ईडी सरकार आहे, पण सध्या संजय राऊतांची ईडी चौकशी सुरू आहे ती वेगळी गोष्ट”, असं केसरकर म्हणालेत. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय.
ईडी सरकार!
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यात नव्याने स्थापित झालेलं शिंदे सरकार ईडीचं सरकार असल्याचं म्हटलंय. पण त्या मागचा तर्कही त्यांनी सांगितला आहे. “होय आमचं खरंच ईडीचं सरकार आहे. पण ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावातली इंग्रजी आद्याक्षरे आहेत. शिंदेंच्या नावातील E आणि फडणवीसांच्या नावातील D म्हणजेच ED”, असं केसरकर यांनी म्हटलंय.
राऊतांची ईडी चौकशी
संजय राऊतांच्या ईडी चौकशीवरही त्यांनी भाष्य केलंय. “आमचं ईडी सरकार आहे, पण सध्या संजय राऊतांची ईडी चौकशी सुरू आहे ती वेगळी गोष्ट”, असं केसरकर म्हणालेत.
‘एकही आमदार मंत्री झाला नाही तरीही आम्ही शिंदेसाहेबांसोबत’
“आमच्यापैकी एकाही आमदाराने मंत्रीपद मागितलं नाही. कोणतीही यादी तयार नाही. एकनाथ शिंदे जर म्हणाले की आमचा एकही आमदार मंत्री झाला नाही तरीही आम्ही शिंदेसाहेबांसोबत आहोत. आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. तसंच केसरकर यांनी सांगितलं की फडणवीस यांच्या काळातील काही योजना मागील काही वर्षात बंद पडल्या होत्या त्या आता पुन्हा सुरु होतील. जलयुक्त शिवार हे फडणवीस यांचं स्वप्न होतं. योजना अमलात येताना काही चुका होतात. त्याचा दोष प्रमुखावर कसा दिला जाऊ शकतो? त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. आम्हाला त्याचा फार आदर आहे. त्यांचा गैरसमज झाला असेल तर काळाच्या ओघात हे गैरसमज दूर होतील असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केलाय”, असंही केसरकरांनी म्हटलंय.