शिंदे सरकारमध्ये नाराजी असल्याची कुजबूज, केसरकरांनी 4 शब्दात खरं काय ते सांगितलं…

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी असल्याची कुजबूज आहे. त्यावर केसरकरांनी उत्तर दिलं आहे....

शिंदे सरकारमध्ये नाराजी असल्याची कुजबूज, केसरकरांनी 4 शब्दात खरं काय ते सांगितलं...
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 1:04 PM

कोल्हापूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं. देवेंद्र फडणवीसांच्या हातात हात देत सरकार स्थापन केलं. त्यानंतर आता शिंदे गटातील नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर आता शिंदेगटाकडून ठोस प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिंदेगटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी चार शब्दात उत्तर दिलं आहे. कोल्हापूरमध्ये दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं.

कुणीही आमदार नाराज नाही!, असं केसरकर म्हणालेत.

निवडीच्या फॉर्म्युल्यावरून आमच्यात कोणतेही भांडण होणार नाही. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात संवाद चांगला आहे. त्यामुळे भांडणाचा आणि नाराजीचा प्रश्नच येत नाही, असं केसरकर म्हणालेत.

झटपट निर्णय घेण्याची क्षमता असल्याने नेते आमच्या युतीकडे येत आहेत. नेत्यांची पार्श्वभूमीवर पाहून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अनेक राजकीय पक्ष आम्हाला पाठींबा देण्याच्या तयारीत आहेत, असं म्हणत युतीचं भविष्य उज्ज्वल असल्यााचं केसरकरांनी सांगितलं.

ज्या लोकांची सत्ता गेली ते आमच्यात अस्वस्थता आहे, असं म्हणतच राहणार! किती वेळा आम्ही हे ऐकत बसायचं.आम्ही आमचं काम करत आहोत आणि करत राहणार, असंही दीपक केसरकरांनी म्हटलं आहे.

आमच्यावर टीका करणाऱ्यांनी लोकांच्या हिताचे अनेक निर्णय का घेतले नाही हे सांगावं. काम करणाऱ्या लोकांवर टीका होतात. पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांची कामं करावी लागतात, असंही केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरेगटाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असं म्हणत केसरकरांनी निशाणा साधलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.