Sanjay Raut : पुढच्या वेळेस सावंतवाडीतून निवडूण येऊन दाखवावं, संजय राऊतांचं केसरकरांना उत्तर

एकनाथ शिंदे गटात बंडखोर आमदरांची संख्या वाढत असली तरी पक्ष प्रमुख यांच्या मान्यतेनेच सर्वकाही सुरळीत व्हावे असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले होते. मात्र, संजय राऊतांसारख्या प्रवक्त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. हे असेच सुरु राहिले तर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील दरी वाढत जाणार असल्याचे सांगितले होते.

Sanjay Raut : पुढच्या वेळेस सावंतवाडीतून निवडूण येऊन दाखवावं, संजय राऊतांचं केसरकरांना उत्तर
खा. संजय राऊत आणि आ. दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 11:24 AM

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून बंडखोर आमदार (Deepak Kesarkar) दीपक केसरकर हे शिंदे गट आणि शिवसेना यांच्या मध्यस्ती करण्याच्या भूमिकेची वक्तव्य करीत आहेत. मात्र, खा.  (Sanjay Raut) संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे अधिक दरी पडत आहे. असे प्रवक्ते पक्षाला लाभले तर पक्षाचे नुकसानच होणार असे दीपक केसरकर यांनी पत्राद्वारे सुनावले होते. यानंतर आता संजय राऊतांनी त्यांना त्यांच्याच स्टाईमध्ये उत्तर दिले आहे. दीपक केसरकर हे आता नव्याने पक्षात दाखल झाले आहेत. त्यांना काय माहिती शिवसेना पक्ष. एवढेच नाहीतर त्यांनी यावेळी (Sawantwadi) सावंतवाडी मतदार संघातून निवडूण येऊन दाखवावे असेही राऊत यांनी ठणकावले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील दरी आणखी वाढणार का अशी स्थिती निर्माण झाली आहे.

केसरकर अन् राऊतांमध्ये शाब्दिक चकमक

एकनाथ शिंदे गटात बंडखोर आमदरांची संख्या वाढत असली तरी पक्ष प्रमुख यांच्या मान्यतेनेच सर्वकाही सुरळीत व्हावे असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले होते. मात्र, संजय राऊतांसारख्या प्रवक्त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. हे असेच सुरु राहिले तर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील दरी वाढत जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, बंडखोरांनी गुवाहटीतून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ले देऊ नये. यासाठी एकनाथ शिंदे यांनी थेट मुंबईत येऊन थेट चर्चा करावी असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. तर दुसरीकडे काल-परवा आलेल्यांनी पक्षाची भूमिका आणि ध्येय धोरणे यावर न बोललेलेच बरे असे म्हणत त्यांनी केसरकर यांना फटकराले आहे. त्यामुळे राऊत आणि केसरकर यांच्या शाब्दिक चकमक होत आहे. यावरुन कुणाची धोरणे ठरणार आणि कुणाचे नुकसान होणार हे पहावे लागणार आहे.

संजय राऊतांचे थेट आव्हान..!

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे बंडखोर आमदारांबद्दल आपले आणि पक्षाची काय भूमिका आहेत हे माध्यमांसमोर मांडत आहेत. मात्र, यामुळेच शिवसेना पक्षाचे नुकसान होत असल्याचे केसरकर यांनी पत्राद्वारे लक्षात आणून दिले होते. त्यामुळे केसरकर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षात आलेले आहेत. त्यामुळे पक्षाची धोरणांबद्दल त्यांनी न बोललेलच बरे असे म्हणत आगामी निवडणुकीत त्यांनी सावंतवाडीतून निवडुण येऊन दाखवावे असे खुले आव्हानच राऊतांनी दिल्यानंतर आता केसरकर यावर काय म्हणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

केसरकर यांची मध्यस्तीची भूमिका

बंडखोर आमदारांचा स्वतंत्र गट झाला असला तरी या पक्ष प्रमुखांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध हे चांगले आहेत. त्यांनी मनात आणले तरी सर्वकाही सुरळीत होईल ही भूमिका घेऊन दीपक केसरकर हे माध्यमांसमोर येत आहेत. शिवाय आजही शिंदे गट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मानत आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या आणि आमदारांच्या हिताचा निर्णय घेण्याची भावनिक साद केसरकर यांनी यापूर्वीही घातलेली आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.