गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? चंद्रकांतदादांच्या ऑफरवर अशोक चव्हाणांचा सवाल

देगलूर-बिलोलीतून भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. या ऑफरवर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे? असा सवाल चंद्रकांत पाटलांना केलाय.

गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? चंद्रकांतदादांच्या ऑफरवर अशोक चव्हाणांचा सवाल
चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 4:30 PM

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यावेळी पाटील यांनी मतदारांना एक ऑफर दिली आहे. देगलूर-बिलोलीतून भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. या ऑफरवर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे? असा सवाल चंद्रकांत पाटलांना केलाय. तसंच त्यांच्या हातात काही नसल्याचा टोलाही चव्हाण यांनी लगावलाय. (Ashok Chavan criticizes Chandrakant Patil’s offer of village meal in Nanded)

चंद्रकांत पाटलांची नेमकी ऑफर काय?

देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिलीय. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं. पाटील यांच्या गाव जेवणाच्या ऑफरमुळे ते चांगलेच चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देगलूर-बिलोली विधानसभेत पाटील यांच्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

डॉ. मीनल खतगावकर यांचाही भाजपला रामराम

दुसरीकडे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर त्यांना सूनबाई डॉ. मीनल खतगावकर यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. मीनल खतगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. दरम्यान, अशोक चव्हाण यांचे भाऊजी असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांनी 7 वर्षापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णाही भाजपवासी झाले होते. पण या दोन्ही नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान आणि सन्मान मिळत नसल्यानं ते नाराज होते. अशोक चव्हाण यांना आपल्या भाऊजींचे मन वळवण्यात अखेर यश आलं आहे. त्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर आणि ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपला रामराम ठोकत असल्याचं जाहीर केलंय.

‘तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन’

दरम्यान, सांगलीतही त्यांनी अशीच एक ऑफर दिली होती. सांगली महापालिकेत ‘कार्यक्रम’ करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक ‘मोठा शॉक’द्या. तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, असं सांगत पाटील यांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी नवे ‘टार्गेट’ दिले होते.

महापालिकेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समिती सभापती निवडीत भाजपने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना यांच्या संभाव्य कार्यक्रमाला दाद न देता आपले वर्चस्व ठेवले. याबद्दल जयंत पाटील यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करीत नवे ‘टार्गेट’ दिले. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी महापौर- उपमहापौर निवडणुकीत भाजप सोडून गेलेल्यांना परतण्याचे आवाहनही केले.

इतर बातम्या :

‘सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र’ हीच यांची घोषणा, जयंत पाटलांवर भाजपची जोरदार टीका

‘ईडी हा विषय आता नेहमीचा झालाय, घाबरण्याचं कारण नाही’, चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला नाना पटोलेंचं उत्तर

Ashok Chavan criticizes Chandrakant Patil’s offer of village meal in Nanded

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.