‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिली. गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे. पण या सरकारनं गरीबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे. आयकर खात्याच्या घाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवलाय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. यावेळी फडणवीस यांनी एका प्रचारसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईच आहे. अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे सरकारला मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय. (Devendra Fadnavis criticizes Ashok Chavan and MahaVikas Aghadi government)
खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आली नसती तर बरं झालं असतं. मात्र, ही निवडणूक आल्यावर या माध्यमातून इथल्या मतदारांना एक संधी मिळालीय. राज्य सरकारच्या कामावर नापसंती व्यक्त करण्याची ही संधी मिळतेय. या सरकारने 2 वर्षात राज्यात केवळ भष्ट्राचार केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिली. गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे. पण या सरकारनं गरीबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे. आयकर खात्याच्या घाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवलाय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
LIVE | Addressing public meeting at Kundalwadi in Nanded district for Deglur by-election. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी प्रचारसभा@BJP4Maharashtra #BJP #Nanded #Deglur https://t.co/kMoUhOXTd8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 25, 2021
‘मंत्र्याचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकतो, मग शेतकऱ्यांनाही परवानगी द्या’
एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला. पण मंत्री म्हणतो की ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी खोचक टीका फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केलीय.
‘मतदान झालं की इथेही वीज कट करायला येतील’
आमच्या काळात पाच वर्षात एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाही. एकाही शेतकऱ्याची त्याबाबत तक्रार नाही. मात्र, या सरकारमध्ये सर्रास वीज कापली जात आहे. नांदेडमध्येही हे फक्त पोटनिवडणुकीसाठी थांबले आहेत. एकदा पोटनिवडणूक होऊ द्या, मग इथेही वीज कट करायला येतील, असंही फडणवीस म्हणाले. कोरोना काळात केंद्र सरकारनं मोठी मदत केली. पण राज्य सरकारनं एका नव्या पैशाची मदत केली नाही. मूठभर धन दांडग्या लोकांचं हे सरकार आहे. मालदार, शेठ, सावकार लोकांचं हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
आज रात्री नांदेड येथे पोहोचलो ! देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोट-निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार सुभाष साबने यांच्या प्रचारार्थ कुंडलवाडी, बिलोली आणि देगलूर येथे उद्या प्रचारसभा होणार आहेत. #Nanded #Deglur #Byelection #Maharashtra pic.twitter.com/eVwISnFN9i
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2021
‘पैशानं निवडणूक जिंकता आली नसती तर लोकसभेला तुम्ही हरले नसते’
लोकशाहीत मतदानाच्या माध्यमातून आपला राज व्यक्त करता येतो. या सरकारनं एकएका समाजाची अवस्छा काय केली आहे. ओबीसींचं आरक्षण काढलं. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं आरक्षण गेलं. हे केवळ ‘पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं सरकार आहे. सुभाष साबणे यांनी 15 वर्षे माझ्यासोबत काम केलं आहे. ते धडाडीने काम करणारे नेते आहेत. राजकारणात गैरसमज होत असतात. दरी निर्माण होत असते. पण साबणे हे स्वतंत्र काम करणारा माणूस आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही लढाई आहे. पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकता आली असती तर अशोकराव लोकसभेला तुम्ही हरलेच नसते. लोकांची डोकी फिरली की शॉक द्यावा लागतो. तसा शॉक या निवडणुकीत या लोकांना द्या, असं आवाहन फडणवीसांनी मतदारांना केलंय.
इतर बातम्या :
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, पालकमंत्री सुभाष देसाईंचं खासदार इम्तियाज जलील यांचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis criticizes Ashok Chavan and MahaVikas Aghadi government