AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी म्हणाले देशद्रोह्यांना मतदान करु नका, दिल्लीकरांनी ऐकलं, भाजपला नाकारलं : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Delhi election results) यांनी दिल्ली निकालावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

मोदी म्हणाले देशद्रोह्यांना मतदान करु नका, दिल्लीकरांनी ऐकलं, भाजपला नाकारलं : नवाब मलिक
| Updated on: Feb 11, 2020 | 10:09 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Delhi election results) यांनी दिल्ली निकालावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशद्रोह्यांना मतदान करु नका, ते दिल्लीच्या जनतेने ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं, असा हल्लाबोल नवाब मलिक (Nawab Malik Delhi election results) यांनी केला. भाजपने हजारो कोटी वाटूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असं हरल्यानंतर नवाब मलिक म्हणाले.

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. मात्र सकाळी दहावाजेपर्यंत आलेल्या कलानुसार इथे आपने 50 जागांवर आघाडी मिळवत, बहुमताचा आकडा पार केला. तर भाजपला 20 जागांपर्यंतच आघाडी घेता आली.

या निकालावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशद्रोह्यांना मतदान करु नका, ते दिल्लीच्या जनतेने ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं. दिल्लीकरांनी भाजपला देशद्रोही घोषित केलं. जनतेला जो सल्ला दिला होता तो जनतेने ऐकला. भाजपने दिल्लीत धार्मिक तेढ निर्माण केला. शाहीनबाग प्रकरणी देशद्रोही ठरवलं. भाजपचे ‘चाणक्य’ अमित शाहांच्या 40 सभा झाल्या, 270 खासदार प्रचारात होते. अनेक आजी-माजी मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून होते. हजारो कोटी रुपये खर्च केले. मतदारांना पैसे वाटताना भाजपवाल्यांना पकडलं, तरीही भाजपचा पराभव झाला”

यापुढे बिहार, उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यातून भाजप हद्दपार होईल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.