दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात 65 जणांचा शड्डू, अरविंद केजरीवालांची संपत्ती…

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अरविंद केजरीवालांच्या संपत्तीत 50 टक्क्यांनी म्हणजे 1.03 कोटींनी वाढ झाली आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात 65 जणांचा शड्डू, अरविंद केजरीवालांची संपत्ती...
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 11:33 AM

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात दीडपटीने वाढ झाली आहे. केजरीवाल यांनी काल (मंगळवारी) नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. केजरीवालांविरोधात तब्बल 65 जणांनी शड्डू ठोकला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात केजरीवालांनी आपल्याकडे 3.40 कोटींची संपत्ती (Arvind Kejriwal Property) असल्याचा उल्लेख केला आहे.

2015 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी आपली संपत्ती 2.10 कोटी रुपये असल्याचं नमूद केलं होतं. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत संपत्तीत 50 टक्क्यांनी म्हणजे 1.03 कोटींनी वाढ झाली आहे. अरविंद केजरीवालांकडे 9.65 लाख रुपयांची रोकड आणि मुदत ठेवी आहेत.

केजरीवाल यांच्या स्थावर मालमत्तेत 2015 पासून कोणतीही वाढ झालेली नाही. त्यांची स्थावर मालमत्ता 1.92 कोटी रुपये इतकी आहे. त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांच्या नावे एक कोटींची संपत्ती आहे. सुनिता यांच्याकडे 57 लाखांची रोकड आहे. मिसेस केजरीवालांनी सरकारी नोकरीतून व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांना 32 लाख रुपये मिळाले होते.

केजरीवालांविरोधात 65 उमेदवार

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात 65 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापैकी बहुतांश अपक्ष उमेदवार आहेत. भाजपकडून सुनील यादव, तर काँग्रेसकडून रोमेश सभरवाल निवडणूक लढवणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहा तास वाट पाहावी लागली होती. केजरीवाल अर्ज भरण्यासाठी सहकुटुंब दाखल झाले, तेव्हा त्यांना 45 नंबरचं टोकन देण्यात आल होतं. अखेर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचा नंबर लागला होता.

केजरीवाल सोमवारीही निवडणूक अर्ज भरण्यासाठी निघाले होते. परंतु रोड शोमध्ये तूफान गर्दी असल्यामुळे ते जामनगर हाऊसपर्यंत पोहचू शकले नव्हते. अखेर मंगळवारी केजरीवालांनी निवडणूक अर्ज दाखल केला.

स्थानिक टीव्ही वाहिनी ‘पृथ्वी दर्शन’चे मालिक योगी माथुरही केजरीवालांविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. ‘केजरीवाल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यास अपात्र आहेत, राजकीय नेत्याने काय करायला हवं, हे आपण दाखवून देणार’ असल्याचं माथुर म्हणाले.

याशिवाय वकील, शिक्षकही केजरीवालांविरोधात निवडणूक लढवत आहेत. 50 पेक्षा जास्त उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत किंवा त्यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता नाही.

Arvind Kejriwal Property

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.