CBI कडून सिसोदिया यांच्या लॉकरची छाननी, तर तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना ED चा समन्स
केंद्रीय तपास यंत्रणा सध्या सक्रीय झाल्याचं दिसतंय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या लॉकरची सीबीआयकडून छाननी केली जात आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही तपास यंत्रणा अॅक्टिव्ह आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा सध्या सक्रीय झाल्याचं दिसतंय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या लॉकरची सीबीआयकडून छाननी केली जात आहे. सीबीआयने थोड्यावेळा आधी म्हणजेच 11 वाजता मनीष सिसोदिया यांच्या बँक लॉकरची तपासणी करायला सुरुवात केलीय. गाझियाबादच्या वसुंधरा सेक्टर 4 इथल्या पंजाब नॅशनल बँकेत मनीष सिसोदिया यांचे बँक लॉकर आहे. त्याच्या तपासासाठी सीबीआयचं पथक या बँकेत पोहोचलं. यावेळी मनीष सिसोदिया आणि त्यांची पत्नीही तिथे हजर आहेत.
दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही तपास यंत्रणा अॅक्टिव्ह आहेत. अंमलबजावणी संचालनालया अर्थात ईडीने तृणमूलच्या नेत्यांना लक्ष केलंय. कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने तृणमूलचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) समन्स पाठवलं आहे. 2 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. ईडीच्या कोलकाता मधल्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
West Bengal | Enforcement Directorate has summoned TMC leader Abhishek Banerjee to appear at the agency’s Kolkata office on 2nd September, in the ongoing coal scam case.
(file photo) pic.twitter.com/6uNbPHm5Fu
— ANI (@ANI) August 30, 2022
दिल्लीच्या शिक्षण क्षेत्रात पैश्यांची अफरातफर झाल्याचा सिसोदियांवर आरोप आहे. त्याप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. सीबीआयकडून ही कारवाई केली जात आहे. सीबीआयने काही दिवसांआधी मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला होता. तसंच सीबीआयने या प्रकरणी माजी अबकारी आयुक्त अरवा गोपी कृष्णाना यांच्या घरी ही छापा टाकला.
अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांची एक विशेष टीम दिल्लीहून कोलकात्याला जाणार आहे. ईडीचं विशेष पथक त्यांची चौकशी करणार आहे. मागच्या वर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीने अभिषेक बॅनर्जी यांची आठ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना समन्स पाठवण्यात आलं आहे.