Delhi Elections 2020 : ‘आप’ची हॅट्ट्रिक भाजप रोखणार? दिल्ली विधानसभेसाठी मतदान

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबागमध्ये झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

Delhi Elections 2020 : 'आप'ची हॅट्ट्रिक भाजप रोखणार? दिल्ली विधानसभेसाठी मतदान
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 9:08 AM

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी आज (शनिवार 8 फेब्रुवारी) मतदान होत आहे. दिल्लीतील 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया (Delhi Vidhansabha Election Voting) पार पडत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विजयाची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी भाजपने जंग-जंग पछाडलं आहे. त्यामुळे दिल्लीवर कोण झेंडा फडकवणार, याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं आहे.

दिल्ली काबीज करण्यासाठी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या त्रिकूटाची प्रतिष्ठाच या निवडणुकीत पणाला लागली आहे. भाजपने तीनशे खासदारांसह 11 राज्यांतील मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उतरवलं होतं. महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्र्यांची फौजही प्रचारात उतरली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबागमध्ये झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. सुरुवातीला ‘आप’चं पारडं जड मानलं जात असलं, तरी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपही ‘हम किसी से कम नहीं’च्या जोशात दिसला. काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात असली, तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराप्रमाणेच दिल्लीतही पक्ष निष्प्रभ ठरताना दिसत आहे. त्यामुळे खरी लढाई आप विरुद्ध भाजपच मानली जाते.

2015 मधील पक्षीय बलाबल

आप – 67 भाजप – 03 काँग्रेस – 00 एकूण – 70

‘आप’ची कामगिरी

विधानसभा 2013 – 28/70 लोकसभा 2014 – 00/07 विधानसभा 2015 – 67/70 महापालिका 2017 – 49 लोकसभा 2019 – 00/07

दिल्लीतील एक कोटी 47 लाख मतदार मतदानाचा हक्क (Delhi Vidhansabha Election Voting) बजावणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मंगळवार 11 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल हाती येतील.

दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी एकूण 672 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत एकूण 1 कोटी 47 लाख 86 हजार 382 मतदार आहेत. राजधानीत पुरुष मतदारांची संख्या 81 लाख 05 हजार 236, तर महिला मतदारांची संख्या 66 लाख 80 हजार 277 इतकी आहे. 869 तृतीयपंथी मतदार आहेत. 2 लाख 32 हजार 815 मतदार 18-19 वर्षे वयोगटातील आहेत.

दिल्ली निवडणुकीसाठी ईव्हीएम, संवेदनशील बूथ आणि मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतील एकूण 2 हजार 689 मतदान केंद्रांपैकी 545 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तर 21 मतमोजणी केंद्रांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. (Delhi Vidhansabha Election Voting)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.