AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बूस्टर डोस मोफत द्या : आरोग्य मंत्री राजेश टोपेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी, कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोफत करावा. तसेच त्याचा खर्च केंद्राने उचलावा अशा प्रकारची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

बूस्टर डोस मोफत द्या : आरोग्य मंत्री राजेश टोपेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
आरोग्य मंत्री टोपे यांनी बूस्टर डोसImage Credit source: tv9
| Updated on: Jun 13, 2022 | 9:47 PM
Share

जालना : देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण (Corona) वाढत असून चिंता वाढली आहे. त्यामुळे विमानासह रेल्वे प्रवासातही मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर कर्नाटकातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर सध्या राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या झापाट्याने वाढताना दिसत आहे. ज्यामुळे येथेही काही नियम करावे लागतील अशी स्थिती आहे. यावरून याअधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी देखील नियम नको असतील तर मास्क वापरा. स्वत: कोरोनाचेस नियमांचे पालन करा असे म्हटले होते. त्यानंतर आता आरोग्य मंत्री टोपे यांनी बूस्टर डोस (Booster Dos) मोफत देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. त्यांनी ही मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्या सोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये केली.

यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी, कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोफत करावा. तसेच त्याचा खर्च केंद्राने उचलावा अशा प्रकारची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलताना ते म्हणाले, प्रायव्हेट हॉस्पिटल मधील मर्यादित क्षमता पाहता सर्वदूर बूस्टर डोस उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून त्याचा चांगला उपयोग होईल. सध्या बूस्टर डोसचा 380 रुपये असा दर आहे. त्यामुळे नागरिकांतून विचारणा होते. त्यामुळे तो मोफत करावा अशी मागणी त्यांनी केलीय.

दरम्यान लसीकरण जर कोणी सक्षमपणे पुढे नेली असेल तर त्या आशा वर्कर यांनी. त्यामुळे लसीकरण मोहीम राबवणाऱ्या आशा वर्करला केंद्राकडून 2000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची देखील मागणी केल्याचे त्यांनी सांगितलंय.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.