राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर, कुणाला कोणते खाते? शिंदे गट की भाजपा? कुणाला मिळाले झुकते माप, खातेवाटपाची यादी वाचा एका क्लिकवर..
मुख्यमंत्र्यांकडे ११ खात्यांचा कार्यभार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ यासह सात मंत्र्यांचा पदभार ठेवण्यात आलेला आहे. कृषी खाते अब्दुल सत्तार यांना तर आरोग्य खाते तानाजी सावंत यांना देण्यात आले आहे. राज्यपात भगतसिंग कोश्यारी यानी मंजुरी दिल्यानतर खावाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्याचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुमारे तीन दिवसांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्र्यांकडे ११ खात्यांचा कार्यभार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ यासह सात मंत्र्यांचा पदभार ठेवण्यात आलेला आहे. कृषी खाते अब्दुल सत्तार यांना तर आरोग्य खाते तानाजी सावंत यांना देण्यात आले आहे. राज्यपात भगतसिंग कोश्यारी यानी मंजुरी दिल्यानतर खावाटप जाहीर करण्यात आले आहे.
१. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, अगर विकास माहिती व तंत्रज्ञान, गाहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बाधकाम (सार्वजनिक प्रकल्प परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपती व्यवस्थापन मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप केले विभाग
२. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गृह विनियोजन विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील
इतर 18 मंत्र्यांची यादी
भाजपाचे मंत्री
- मंगलप्रभात लोढा – पर्यटन आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास
- राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन , दुग्धविकास
- अतुल सावे – सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण
- गिरीश महाजन – ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
- विजयकुमार गावित – आदिवासी विकास
- रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा
- चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- सुरेश खाडे – कामगार
- सुधीर मुनगंटीवार – वन, सास्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय
शिंदे गटाचे मंत्री
- उदय सामंत – उद्योग
- दीपक केसरकर – शालेय शिक्षण आणि मराठी भाषा
- शंभूराजे देसाई – उत्पादन शुल्क
- दादा भुसे – बंदरे आणि खनीकर्म
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा आणि स्वच्छता
- संदीपान भुमरे – रोहयो योजना, फळोत्पादन
- अब्दुल सत्तार – कृषी
- तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
- यवतमाळ- संजय राठोड – अन्न आणि औषध प्रशासन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला मंजुरी दिली आहे. लवकरच सर्व मंत्री आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.