राज्यपाल प्रकरणी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज चढतो!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बाबत प्रश्न विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पत्रकारांवर आवाज चढला.

राज्यपाल प्रकरणी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज चढतो!
अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 12:41 PM

मुंबई : ठाकरे सरकारनं राज्यपाल कोश्यारींना हवाई वाहतूक करण्याची परवानगी नाकारली आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला. त्याच वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी गाठलं. त्यांना ह्या प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांचा आवाज चढला.(Deputy CM Ajit Pawar raised his voice on the question of Governor Bhagat Singh Koshyari)

नेमकं काय घडलं?

राज्यपाल कोश्यारींवर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी माहिती नसल्याचं सांगितलं. ते कुठं व्यस्त होते हेही त्यांनी सांगितलं. मंत्रालयात जाऊन पूर्ण माहिती घेतो आणि पुन्हा तुमच्याशी बोलतो असंही अजित पवार म्हणाले. त्यानंतर इतर काही प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली. काही प्रश्न झाल्यानंतर अजित पवारांना पुन्हा एका पत्रकारानं राज्यपाल प्रकरणावरच प्रश्न केला. त्यावेळेस मात्र अजित पवारांचा आवाज चढला.

काय आहे प्रकरण? 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमधील वाद शमण्याचं नाव घेत नाही. त्याचाच प्रत्यय आज आलाय. कारण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज उत्तराखंडचा दौरा करायचा होता. पण राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगीच दिली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे राज्यपाल कोश्यारी हे विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळालं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.

भाजप नेत्यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्राच्या इतिहासात इतका ईगो असलेलं सरकार आपण पाहिलेलं नाही. राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱ्याबाबत सर्व शासकीय प्रक्रिया पार पडली होती. पण राज्य सरकारनं त्यांना विमानातून उतरवणं हे दुर्दैवी आहे. ठाकरे सरकारला कुठला अहंकार आहे? असा सवाल फडवणीस यांनी केलाय. तसंच राज्यपाल ही व्यक्ती नाही. आपण कुठल्या पदाचा अवमान करत आहोत, हे देखील सरकारला कळत नाही, अशी टीका फडणवीसांनी राज्य सरकारवर केलीय.

राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. इतकंच नाही तर राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

संबंधित बातम्या : 

राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल : सुधीर मुनगंटीवार

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

Deputy CM Ajit Pawar raised his voice on the question of Governor Bhagat Singh Koshyari

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.