उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री; मुंबईची जबाबदारी कुणावर?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis ) हे तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे.
जिल्हा निहाय पालकमंत्र्यांची यादी
- राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
- सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
- चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
- गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
- गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक,
- संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
- सुरेश खाडे- सांगली,
- संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
- उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
- रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
- अब्दुल सत्तार- हिंगोली,
- दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
- अतुल सावे – जालना, बीड,
- शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
- मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर