विधानभवनात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा, कोरोना अहवालासाठी आमदार प्रवेशद्वारावर ताटकळत, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं

महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचा कसा फज्जा उडाला हे टीव्ही 9 ने वारंवार दाखवंलच आहे. मात्र थेट विधानभवनातही व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजलेत, हेही महाराष्ट्राला दिसलं.

विधानभवनात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा, कोरोना अहवालासाठी आमदार प्रवेशद्वारावर ताटकळत, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
Follow us
| Updated on: Sep 08, 2020 | 7:05 AM

मुंबई : महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 10 लाखांच्या घरात पोहोचली आहे (Ajit Pawar At Vidhan Bhavan). तरीही आरोग्य व्यवस्था काही सुधारताना दिसत नाही. एकूणच व्यवस्थेचा चांद्यापासून बांद्यापर्यंत कसा बोजवारा उडलाय, हे विधान भवनातही दिसलं. त्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावलं (Ajit Pawar At Vidhan Bhavan).

महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचा कसा फज्जा उडाला हे टीव्ही 9 ने वारंवार दाखवंलच आहे. मात्र थेट विधानभवनातही व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजलेत, हेही महाराष्ट्राला दिसलं. आमदारांच्या कोरोना रिपोर्टसाठी खुद्द अजितदादांना कर्मचाऱ्यांजवळ विचारणा करावी लागली.

राज्यातील कोरोना स्थिती काय?

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत देशभरातील पहिल्या 5 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 4 शहरं आहेत. रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार,

  • पुणे जिल्ह्यात एकूण 1 लाख 99 हजार 303 रुग्ण आहेत. यापैकी 61 हजार 383 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
  • दुसऱ्या क्रमांकावर ठाणे शहर आहे. ठाणे जिल्ह्यात 1 लाख 43 हजार 178 एकूण रुग्ण असून 24 हजार 941 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
  • तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. 1 लाख 55 हजार 622 रुग्णांपैकी 23 हजार 939 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
  • चौथ्या क्रमांकावर उपराजधानी नागपूर आहे. इथे 38 हजार 144 पैकी 17 हजार 86 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

म्हणजेच आकडेवारीवरुन स्पष्ट दिसतंय, की महाराष्ट्रातली स्थिती चिंताजनक आहे. त्यातच सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्याची परिस्थिती काही बदलताना दिसत नाही. कारण, कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या आपल्या वडिलांना घेऊन मुलगा हॉस्पिटलमध्ये वणवण फिरला, पण तरीही बेड मिळाला नाही. जम्बो हॉस्पिटलमध्ये तरी प्रवेश मिळेल म्हणून मुलाने वडिलांना इथेही आणले. पण, अपुरी व्यवस्था असल्याने जम्बो हॉस्पिटलकडून पुढचे 2 दिवस नव्या रुग्णांना प्रवेश बंद करण्यात आला आहे (Ajit Pawar At Vidhan Bhavan).

पुण्यातली स्थिती सुधारताना दिसत नाही. आमदारांच्या बाबतीतही असंच दिसतं आहे. सभागृहात जाण्याआधी आवश्यक कोरोनाचे रिपोर्टच आमदारांना वेळेत मिळाले नाही. त्यामुळे हरिभाऊ बागडेंनी अजितदादांकडेच तक्रार केली.

आमदार रिपोर्टची प्रतीक्षा करत होते आणि एक एक आमदाराच्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जाही उडाला. अखेर दादांनी थेट अधिकाऱ्यांनाच प्रवेशद्वारावर बोलावून खडेबोल सुनावले आणि कर्मचाऱ्यांची शाळा घेतली.

म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा तिथं आले नसते, तर आमदारांनाही प्रवेश मिळाला नसता. ही स्थिती आहे. राज्याचा गाडा कसा हाकता येईल, यावर जिथं मंथन होतं, त्या विधान भवनातली. त्यामुळे कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांचं काय होत असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

Ajit Pawar At Vidhan Bhavan

संबंधित बातम्या :

विधानपरिषद उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर, भाजपकडून ‘या’ आमदाराला उमेदवारी

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.