Ajit Pawar Corona Recovery | उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, सुप्रिया सुळेंकडून डॉक्टरांसह कार्यकर्त्यांचे आभार

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉटस्अॅप स्टेट्स ठेवत याबाबतची माहिती दिली. (Deputy CM Ajit Pawar Recovered from Corona)

Ajit Pawar Corona Recovery | उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, सुप्रिया सुळेंकडून डॉक्टरांसह कार्यकर्त्यांचे आभार
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 3:05 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतंच त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉटस्अॅप स्टेट्स ठेवत याबाबतची माहिती दिली. (Deputy CM Ajit Pawar Recovered from Corona)

अजित पवारांना 26 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.

सात दिवसांच्या उपचारानंतर आज (2 नोव्हेंबर) उपमुख्यमंत्र्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत. महत्वाच्या बैठकांना देखिल उपमुख्यमंत्री व्हीसीद्वारे उपस्थित असतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

त्यानतंर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नुकतंच सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवल आहे. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि डॉक्टरांचे आभार असे लिहिले आहे.

“राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

आठवड्याभरापूर्वी कोरोनाची लागण 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. पहिल्यांदा त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा टेस्ट केली असता तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. (Deputy CM Ajit Pawar Recovered from Corona)

संबंधित बातम्या :

Ajit Pawar Corona : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.