‘मी पाच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं’, अजितदादा चुकून चुकले! जाहीर सभेत ‘कानाला खडा’

साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार चुकून चुकले! अजित पवार यांनी चुकून पालकमंत्री ऐवजी जिल्हाधिकारी हा शब्द वापरला. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी ही चूक लक्षात आणून देताच अजितदादांनी माफी मागत आपली चूक सुधारली.

'मी पाच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं', अजितदादा चुकून चुकले! जाहीर सभेत 'कानाला खडा'
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 9:11 PM

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपली रोखठोक मतं आणि तडाखेबाज भाषणशैलीमुळं प्रचलित आहेत. एखाद्या सभेत किंवा बैठकीत ते कुणाला झापायलाही कमी करत नाहीत. मात्र, साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार चुकून चुकले! अजित पवार यांनी चुकून पालकमंत्री ऐवजी जिल्हाधिकारी हा शब्द वापरला. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी ही चूक लक्षात आणून देताच अजितदादांनी माफी मागत आपली चूक सुधारली. (Deputy CM Ajit Pawar’s Mistake during speech in Satara)

अजित पवार हे सातारा जिल्ह्यातील वडूज इथल्या एका कोव्हिड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. रुग्णालयाचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. मी पाच वर्षे इथं जिल्हाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे जिवाभावाचे अनेक सहकारी लाभले आहेत, असं अजितदादा म्हणाले. दरम्यान, व्यासपीठावर बसलेल्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लक्षात ही चूक आली. पाटील यांनी एक चिठ्ठी पाठवत अजित पवारांना जिल्हाधिकारी नाही तर पालकमंत्री म्हणा, असं सांगितलं.

‘तेव्हापासून कानाला खडा लावला’

आपलं भाषण सुरु असतानाच अजित पवारांनी ती चिठ्ठी वाचली. ‘मी जिल्हाधिकारी म्हणालो का? आता एवढं कुठे शिकलोय. मी आपला पालकमंत्री होतो. खूप दिवसांनी एवढी चूक झाली हो. यापूर्वी खूप मोठी चूक झाली होती आणि त्याची खूप मोठी किंमतही चुकवली होती. तेव्हापासून कानाला खडा लावला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे बसलो आणि साहेब चुकलो असं म्हणालो’, असं अजितदादा म्हणाले. अजितदादांनी दिलेल्या या चुकीच्या कबुलीमुळं उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला.

अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावलाय. ‘आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून उत्तम प्रकारे काम करणारे अनेक पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदीसाहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की, पेट्रोल 100 च्या पुढे गेलं. पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली… घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल!’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांना ‘साले’ बोलणार्‍या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा, जयंत पाटलांचा घणाघात

‘युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या’, रोहित पवारांचा घरचा आहेर

Deputy CM Ajit Pawar’s Mistake during speech in Satara

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.