Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मोठ्या घडामोडी, देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांची फौज अमित शहांच्या भेटीला, कारण काय?

मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली आहे.

मुंबईत मोठ्या घडामोडी, देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांची फौज अमित शहांच्या भेटीला, कारण काय?
देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेते अमित शाहांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 8:07 AM

नवी दिल्ली :  मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली आहे. यावेळी फडणवीसांसोबत भाजप नेत्यांची फौज पाहायला मिळाली. (Devendra Fadanvis And Bjp Leaders Meet Amit Shah in New Delhi)

फडणवीसांसह भाजप नेत्यांची फौज अमित शहांच्या भेटीला

साखर उद्योगाच्या विविध समस्यांसंदर्भात आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची एका शिष्टमंडळासोबत भेट घेतली, अशी माहिती ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

शिष्टमंडळात कोण कोण नेते?

अमित शहांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, पृथ्वीराजबाबा देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कुल आदी नेत्यांचा समावेश होता.

देवेंद्र फडणवीस-अमित शहांमध्ये काय चर्चा?

मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेणं यापाठीमागे आता राजकीय अर्थ लावले जात आहेत. तसंच या शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात देखील काही मिनिटे गुफ्तगू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईच्यात घडामोडींच्या अनुषंगाने शहा-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा कयास बांधण्यात येत आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी

अँटिलियाबाहेर मिळालेली स्फोटकांची गाडी प्रकरण, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूचा तपास आणि आता सचिन वाझे… या सगळ्या प्रकरणावरुन मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उलचबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक असलेले हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा जबाबदारी देण्यात आला.

फडणवीसांची दिल्लीत पत्रकार परिषद

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर अजून एक गंभीर आरोप केलाय.  सचिन वाझे किंवा परमवीर सिंग हि छोटी माणसं आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत केलीय. तसच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIAने आपल्याकडे वर्ग करुन घेण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे.

‘मनसुख हिरेन प्रकरण NIAने वर्ग करुन घ्यावं’

“एटीएस आणि NIA कडे टेप आहेत, त्यामध्ये वाझेने त्यांना काय काय म्हटलंय ते स्पष्ट आहे,. एटीएसकडून सुरुवातीला अॅक्शन दिसली, पण आता काहीच दिसत नाही. एटीएसने आधी अटक करुन त्यांना एनआयएकडे ताब्यात द्यायला हवं होतं. कारण ही दोन्ही एकमेकांशी संलग्न प्रकरणं आहेत. त्यामुळे एटीएसकडे जे प्रकरण आहे ते एनआयएने टेकओव्हर करावं. माझा एटीएसवर अविश्वास आहे असं नाही, मात्र त्यांच्याकडून आवश्यक कारवाई होत नाही. त्यांच्यावर दबाव असावा”.

(Devendra Fadanvis And Bjp Leaders Meet Amit Shah in New Delhi)

हे ही वाचा :

सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे हात शोधा, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मागणी

Mumbai New Police Commissioner : अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Param Bir Singh : हे ठाकरे सरकारचे पाप, मुंबई पोलिसांची इतकी बदनामी कधीच झाली नाही, भाजपचा हल्लाबोल

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.