अयोध्येला जा, तुमचे रक्त उफाळून येईल, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

अयोध्येला जा, तुमचे रक्त उफाळून येईल, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Devendra fadanvis criticized on uddhav thackeray) दिला.

अयोध्येला जा, तुमचे रक्त उफाळून येईल, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
Follow us
| Updated on: Feb 16, 2020 | 5:47 PM

नवी मुंबई : अयोध्येला जा, तुमचे रक्त उफाळून येईल, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Devendra fadanvis criticized on uddhav thackeray) दिला. आज (16 फेब्रुवारी) नवी मुंबईत भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका (Devendra fadanvis criticized on uddhav thackeray) केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता लवकरच राम मंदिर बांधलं जाणार आहे. अनेकजण अयोध्येत जाण्यासाठी निघाले आहेत. तुम्ही तिथे जा, कदाचित तिथे गेल्यानंतर तुमच्या हिंदुत्वाचं रक्त उफाळून येईल. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांना सुबुद्धी देवोत.”

“भाजपचे ऐकवण्याचे दिवस संपले आता सुनवण्याचे दिवस आले आहेत. उद्धवजी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवाल असं वचन बाळासाहेबांना दिले होते का?, तर बाळासाहेबांनी तुम्हाला कधी माफ केले नसते. एखाद्या विश्वासघाताने सरकार गेले,  घाबरण्याचे कारण नाही. आपलं संपूर्ण जीवनचं विरोधकांचं आणि आपला डीएनएदेखील विरोधकांचा आहे. विरोधकाची भूमिका करण्यासाठी थेट मुकाबला करावा लागतो. या सरकारला जेरीस आणायला वेळ लागणार नाही. तुम्ही जनतेविरोधी भूमिका घेतली तर भाजप सरकारला सोडणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“हा काळ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. 370 कलम आमच्यासाठी शल्य होते. काश्मीरच्या प्रत्येक चौकात तिरंगा डौलाने फडकत होता. या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत. आज काश्मीर मध्ये शांतता आहे. कुणी तरी म्हणत होत की रक्ताचे पाट वाहतील पण आता तेथे विकासाचे पाट वाहत आहेत”, असं फडणवीसांनी सांगितले.

“खोटं बोल पण रेटून बोल, जवाहरलाला नेहरु यांनी लियाकतसोबत करार केला होता की, जर पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि जैन धर्मियांवर जर अत्याचार झाला त्यांना आम्ही भारतात घेऊ. पण काही लोक सत्तेविना मासळीसारखे तडफडत आहेत. कुणाचीही नागरिकता काढून घेतली जाणार नाही. असे असून अनेकजण चुकीची माहिती पसरवत आहेत”, असंही फडणवीस यांनी सांगितले.

“काही पक्ष सत्तेत येण्यासाठी तेढ निर्माण करतात. ते सत्तेविना राहू शकत नाहीत. मोठे मोठे लोकं सत्त्तेसाठी खोटं बोलतात. शरद पवारांना सीएएवर सर्व काही माहिती आहे. लोकांना कन्फ्युज करा, त्यांची दिशाभूल करण्याचं काम ते करत आहेत. त्यांनी मोदींची माफी मागा, देशाची माफी मागा”, असं फडणवीस म्हणाले.

“शरद पवार म्हणतात,सीएएमुळे भटक्यांचे काय होणार. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांना कायदा माहीत नाही का. लोकांना जेंव्हा समजवता येत नाही तर त्यांना गोंधळात टाका”, असे सांगत फडणवीसांनी पवारांवर टीका केली.”

“जो मॅच जिंकून देतो आपण त्यांना कॅप्टन म्हणतात. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण मॅच जिंकलो. कालही विनिंग टीमचे कॅप्टन होता आजही तुम्ही विनिंग टीमचे कॅप्टन आहात. भाजपचं सरकार पुन्हा आणल्याशिवाय राहणार नाही”, असं फडणवीस यांनी सांगत चंद्रकांत पाटील यांचे कौतुक केले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.