शेलार म्हणाले, देवेंद्रजी हे कृष्ण, आता सुदर्शनचक्र काढा, दरेकर म्हणतात, एकटे लढणारे वस्ताद!

फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा, अशा शब्दात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

शेलार म्हणाले, देवेंद्रजी हे कृष्ण, आता सुदर्शनचक्र काढा, दरेकर म्हणतात, एकटे लढणारे वस्ताद!
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 7:36 PM

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा, अशा शब्दात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे. आशिष शेलारांनी केलेलं फडणवीसांचं हे कौतुक म्हणजे राज्याच्या आगामी राजकारणातील उलथापालथीचं भाकीत असल्याचीच चर्चा आता राजकीय विश्वात रंगत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शेलार बोलत होते.(Devendra Fadnavis appreciated by Ashish Shelar and Praveen Darekar)

प्रवीण दरेकर यांच्या लेखाजोखा या पुस्तकाचं प्रकाशन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. जो जनतेची काम करतो तोच जनतेसमोर त्या कामाची ठासून मांडणी करु शकतो, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांचंही कौतुक केलं. प्रवीण दरेकर यांनी जास्त वेळ विरोधी पक्षनेते राहू नये एवढीच इच्छा असल्याचंही शेलास म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरही टीका केली. भेंडीबाजार म्हणलं की सिल्व्हर ओकला त्रास होतो आणि बेहराम पाडा म्हणलं की मातोश्रीला त्रास होतो, असा टोला यावेळी शेलारांनी लगावला आहे.

फडणवीस हे एकटे लढणारे वस्ताद – दरेकर

याच कार्यक्रमात बोलताना प्रवीण दरेकर यांनीही फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली. देवेंद्र फडणवीस हे अजूनही वस्तादच आहेत. ते आजही सगळ्यांशी एकटेच लढत आहेत, अशा शब्दात दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. ज्या झाडाला फळ त्यालाच दगड मारतात, जिथे फळ नाही तिथे कोणी जात नाही, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना कधीच काही नाही मागितलं नाही. न सांगता न मागता मला आमदार केलं आणि तसंच विरोधी पक्षनेता ही बनवलं त्यांनी मला जबाबदारी दिली. मी माझ्या नेत्याला पक्षाला आणि जनतेला उत्तर द्यायला जबाबदार आहे, असंही दरेकर म्हणाले. ज्यावेळी जंगलात वादळ आल होत तेव्हा जंगलातले वाघ बिळात बसले होते, तेव्हा प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस सगळीकडे वादळाचा सामना करत फिरत होते, असा टोला दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.

पुस्तक प्रकाशन सोहळा

प्रविण दरेकर यांच्या कारकिर्दीच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ पुस्तकाचं प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या :

शरद पवारांना भेंडीबाजार झोंबला, आता त्यांना माझी लाज वाटणार नाही : प्रविण दरेकर

शेतकऱ्यांविषयी ‘तो’ प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला, म्हणाले…

Devendra Fadnavis appreciated by Ashish Shelar and Praveen Darekar

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.