वो मशहूर हुए, जो काबिल न थे! बांधावरच्या घोषणेचं काय झालं? सांगा उद्धवजी सांगा! : देवेंद्र फडणवीस

सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन आहे. सरकारविरोधात जो एल्गार पुकारला आहे, यात राज्यभर लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  Devendra Fadnavis attacks on CM Uddhav Thackeray

वो मशहूर हुए, जो काबिल न थे! बांधावरच्या घोषणेचं काय झालं? सांगा उद्धवजी सांगा! : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 3:08 PM

मुंबई : भाजपने महाआघाडी सरकारविरोधात राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारलं आहे. राज्यभरात विविध ठिकाणी 400 आंदोलनं होत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis attacks on CM Uddhav Thackeray)  प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व भाजप दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. (Devendra Fadnavis attacks on CM Uddhav Thackeray)

सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन आहे. सरकारविरोधात जो एल्गार पुकारला आहे, यात राज्यभर लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही, तडजोड करुन सत्तेवर आलेलं सरकार आहे, आज ओ हुए मशहूर जो काबिल न थे, और मंजिले मिली उनको जो दौड में शामिल न थे, अशी अवस्था आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

आम्हाच्या विश्वासघाताची आम्हाला चिंता नाही, आम्ही लढणारे आहोत, पुन्हा मैदानात जाऊन राज्य परत मिळवू. राज्यात जे सरकार आलं आहे, ते जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका या सरकारने सुरू ठेवली आहे. 25 हजार हेक्टरीबाबत काय झालं सांगा उद्धवजी, बांधावर जाऊन तुम्ही घोषणा केली होती. बांधावर जाऊन 25 हजार हेक्टरी मदतीची घोषणा कुणाची होती? सांगा उद्धवजी, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.

काळजीवाहू सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांना मदत केली, राहिलेली रक्कम नवीन सरकारकडून मिळेल अस वाटलं होतं, पण वचनभंगाची सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात पाणी पोहोचावं म्हणून टेंडर काढलं, दुष्काळमुक्त करण्याचा जीआर काढला, पण या सरकारने स्थगिती दिली आहे. हे सरकार फक्त यात टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणत आहे.

राज्यात महिला सुरक्षित नाहीत. गृहमंत्री एक तरी वक्तव्य केलं का? औरंगाबाद मधील पीडितेला गृहमंत्री दोषी ठरवत असतील हे वाईट आहे. दिशा कायदा करणार तेव्हा करा पण आधी महिला भगिनींना सुरक्षा द्या, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस अपमानित करत आहे. याठिकाणी सावरकर यांचं नाव घेणारे सत्तेसाठी काही बोलत नाही. कोणी तरी म्हणतो 100 कोटी वर 15 कोटी भारी आहे , वारीस का लावरीस. त्याला सोडणार नाही. सेना फक्त मूक गिळून बसली आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही खुर्ची सोडणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण भाजप शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान सहन करणार नाही. कोण आहे तो वारिस की लावारिस?

मुंबईत राहणाऱ्या लोकांचा यांनी विश्वासघात केला. राहुल गांधी म्हणाले 500 स्के. फूट घर देऊ असे बोललं होतं. काय झालं त्याचं बिल्डरांचे खिसे कसे भरतील याचा विचार सुरु आहे. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला, महिला आया भगिनींना, झोपडपट्टी राहणाऱ्या सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहिलं. आपला एल्गार सुरु राहिलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

यंदा पुन्हा एकदा चांगला पाऊस आला होता. पीक आलं होतं. शेतकरी स्वप्न बघत होता. मात्र ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस पडला. वचनभंगाची सुरुवात शेतकऱ्यांपासून केली. आमच्या जाहीरनाम्यात नसतानाही आम्ही कर्जमाफी केली. काही तरी सांगायचं यांना एवढं टेक्निकल नॉलेज कुठून आलं. बबनराव लोणीकर इंजिनिअर नव्हते ते मंत्री होते.

हे सरकार आपल्या सरकारने केलेली काम बंद करतं. जलयुक्त शिवारमध्ये जर फॉल्ट होता तर सुधारला का नाही?. बंद का केली. औरंगाबाद कोर्टाने सांगितलं आहे जलयुक्त शिवार योजना बरोबर आहे.

या सरकारला आमच्यापेक्षा मोठी रेषा ओलांडता येत नाही. तुम्ही करा, तुम्ही विकास करुन दाखवा, आमच्यापेक्षा चांगला विकास करा. आमच्यापेक्षा मोठी रेषा ओढा पण ते करता येत नाही म्हणून आमची रेषा पुसण्याचा प्रयत्न करु नका.

कामाला स्थगिती देऊ शकाल. मात्र जनतेच्या मनातील कामांना कशी स्थगिती देऊ शकाल?

जी पीडित असेल तिलाच दोषी ठरवण्याचं काम सुरु असेल. तर मग आम्ही काय करायचं.? महिला अत्याचाराची दररोज एखादी घटना घडते. नराधमांना फासावर चढवण्याची हिंमत कधी येणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस अपमानित करत आहे. याठिकाणी सावरकर यांचं नाव घेणारे सत्तेसाठी काही बोलत नाही. कोणी तरी म्हणतो 100 कोटी वर 15 कोटी भारी आहे , वारीस का लावरीस. त्याला सोडणार नाही. सेना फक्त मूक गिळून बसली आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.