ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’, देवेंद्र फडणवीसांची टोकाची टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची चिरफाड केली.

ठाकरे सरकारने 'चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए', देवेंद्र फडणवीसांची टोकाची टीका
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 12:23 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची चिरफाड केली. (Devendra Fadnavis) असा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असं म्हणत फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना टार्गेट केलं. “सुप्रीम कोर्टाने पत्रकार अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) आणि हायकोर्टाने अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्याबाबत दिलेले निकाल हे या सरकारचे वर्षपूर्तीचे कारनामे आहेत. हे निकाल पाहता या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’ (Chullu Bhar Pani Mein Dub Maro) अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis attacks on Thackeray government, said Chullu Bhar Pani Mein Dub Maro)

भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांवर सडकून टीका केली.

“ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने आरसा दाखवला. अर्णव गोस्वामी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने झापलं. सरकारविरोधी भूमिका घेतल्यामुळे टार्गेट केल्याचं कोर्टाने निकालात नमूद केलं आहे. दुसरीकडे कंगनाप्रकरणातही सरकारविरोधी ट्विट केल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली. तिचं घर तोडण्यात आल्याचं कोर्टाने नमूद केलं. याशिवाय कोर्टाने संजय राऊतांबाबतही टिपणी केली असून खासदाराला अशी भाषा शोभत नसल्याचं म्हटलं. एक वर्षात सरकारची कामगिरी या दोन निकालावरुन दिसते. कोर्टाची टिपणी म्हणजे या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए'”, असं फडणवीस म्हणाले.

या सरकारने किती पत्रकारांवर कारवाई केली, सामाजिक कार्यकर्त्यांवर केली त्याची संपूर्ण यादी आहे. यांनी अप्रत्यक्ष आणीबाणी लादली आहे. लोकशाहीची हत्या या सरकारने केली, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.

वर्षपूर्तीला अचिव्हमेंट काय?

“महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही,” असा खोचक टोला भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

धमकावणारा मुख्यमंत्री पाहिला नाही

फडणवीस म्हणाले की, “दलित, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांबद्दल सरकारचं व्हिजन काय आहे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत माहिती मिळेल, असं वाटत होतं, परंतु मुख्यमंत्र्यांनी केवळ टीका टिप्पणी केली. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात असे धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत”.

(Devendra Fadnavis attacks on Thackeray government, said Chullu Bhar Pani Mein Dub Maro)

संबंधित बातम्या 

Devendra Fadnavis Live | चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत : देवेंद्र फडणवीस

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.