‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ म्हणत पुणे शहरात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स, अमोल मिटकरींसह काही पुणेकरांकडून मात्र ट्रोलिंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करुन फडणवीसांना टोला लगावला आहे. मिटकरी यांच्यासह काही पुणेकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बॅनर्सवर टीका केली आहे.

'नव्या पुण्याचे शिल्पकार' म्हणत पुणे शहरात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स, अमोल मिटकरींसह काही पुणेकरांकडून मात्र ट्रोलिंग
देवेंद्र फडणवीस यांच्या होर्डिंग्सवरुन अमोल मिटकरी यांचा टोला
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 8:51 PM

पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्स लागलेले पाहायला मिळत आहेत. त्यावर नव्या पुण्याचे शिल्पकार, विकासपुरुष अशा उपमा फडणवीसांना देण्यात आल्या आहेत. त्यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करुन फडणवीसांना टोला लगावला आहे. मिटकरी यांच्यासह काही पुणेकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बॅनर्सवर टीका केली आहे. (Amol Mitkari criticizes Devendra Fadnavis on Twitter over hoardings in Pune)

‘आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या बॅनरवरुन आणि त्यांना नव्या पुण्याचे शिल्पकार म्हटल्यावरुन टोला लगावलाय. या ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एका बॅनरचा फोटोही टाकला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स पुण्यातील रस्त्या रस्त्यांवर, अनेक महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यावरुन अनेक पुणेकरांनी ट्वीटरवर सकारात्मक तर अनेकांनी ट्रोल करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अमोल मिटकरींचा पंकजांना सल्ला, फडणवीसांवर निशाणा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपले नेते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेणं त्यांनी टाळलं होतं. तोच धागा पकडत आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला देताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करून हा सल्ला दिला होता. या ट्विटमधून मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्लाही चढवला. ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासनपण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असं आवाहनही मिटकरी यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या :

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह, पंकजा मुंडेंचा थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा?

राष्ट्रवादीच्या कार्यालयात या, सरकारच्या कामांचा ग्रंथ वाचायला देतो; अमोल मिटकरींचा फडणवीसांवर पलटवार

Amol Mitkari criticizes Devendra Fadnavis on Twitter over hoardings in Pune

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.