Petrol Diesel Price Hike : इंधन दरवाढीवरुन केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष तीव्र; आता फडणवीसांनी राज्य सरकारला दिलं थेट आव्हान

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

Petrol Diesel Price Hike : इंधन दरवाढीवरुन केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष तीव्र; आता फडणवीसांनी राज्य सरकारला दिलं थेट आव्हान
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 5:38 PM

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हीसीद्वारे बैठक घेतली. त्यावेळी इंधन दरवाढीच्या (Fuel price hike) मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांनी बिगर भाजपशासित राज्यांचे कान टोचले. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतयं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकीनंतर इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर पलटवार केलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

‘दोषारोप आणि जबाबदारी झटकणे! यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का? मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू!, असं ट्वीट फडणवीस यांनी केलंय. त्याचबरोबर ‘जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का?’ असा सवालही फडणवीस यांनी केलाय.

‘दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का?’

त्याचबरोबर ‘शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या’, असं थेट आव्हानच फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दिलंय.

पंतप्रधानांनी कान टोचले, मुख्यमंत्र्यांचं उत्तर

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारचे कान टोचले. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्रावर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधानांनी कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेल वरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला. मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर केंद्राकडून महाराष्ट्राला सुमारे 26 हजार 500 कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

इतर बातम्या : 

loudspeakers In UP : योगी सरकारचे लाऊडस्पीकरवर कडक पाऊल; मंदिर-मशीदवरील 29 हजार भोंग्याचा आवाज ‘बंद’, 6031 काढले

CM Uddhav Thackeray: देशाच्या विकासात महाराष्ट्राचे सर्वात मोठे योगदान, पण केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.