शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला ठाकरे सरकारला भाग पाडू, भाजप किसान मोर्चात देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

भारतीय जनता पार्टी प्रदेश किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चात फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला ठाकरे सरकारला भाग पाडू, भाजप किसान मोर्चात देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
भाजप किसान मोर्चाच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशाराImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 8:56 PM

मुंबई : ‘शेतकऱ्यांची वीज बिले (Light Bill) माफ करावीत, दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करून एकरकमी एफआरपी द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रु. प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशा अनेक मागण्या विधिमंडळात सरकारला मान्य करण्यास भाग पाडू’, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी व्यक्त केला. भाजप प्रदेश किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चात फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की , ‘महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडून जुलमी वसुली सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडली जाणार नाहीत अशी घोषणा विधिमंडळात केली होती. मात्र या घोषणेला हरताळ फासत शेतकऱ्यांकडून पठाणी पद्धतीने वीज बिल वसुली केली जात आहे. आमचे सरकार सत्तेत असताना वीज बिल थकले तरी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले गेले नव्हते. लाखो रुपयांची वीज बिले थकविणाऱ्या धनदांडग्यांचे वीज कनेक्शन कापण्याची हिम्मत न दाखविणाऱ्या सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा लावला आहे’. तर उसाची एफआरपी दोन हप्त्यात देण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत, तसंच वीज कनेक्शन तोडणे थांबत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा संघर्ष चालूच राहील, असा इशाराही फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिलाय.

‘सत्ता मिळाल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं’

‘शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडावे असे वाटत नाही. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सत्ता मिळाल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे’, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर भाजपने सर्वशक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून हे प्रश्न सोडविल्याखेरीज भाजप स्वस्थ बसणार नाही, असंही पाटील यांनी जाहीर केलंय.

अनिल बोंडे यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे यांनीही ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. सत्तेवर येण्यापूर्वी अतिवृष्टीग्रस्तांसाठी हेक्टरी 1 लाख रु. भरपाई देण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं बोंडे म्हणाले. तर किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी सांगितले की, आघाडी सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक चालविली आहे. अतिवृष्टी, गारपीट यासारख्या संकटांत आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत किसान मोर्चाचा संघर्ष सुरूच राहील.

इतर बातम्या :

निवडणूक आयोगाचे अधिकार कमी होणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

OBC Reservation| ‘भुजबळ बोलायला हुशार!’ फडणवीस म्हणतात, भुजबळांनी बोलता बोलता टोमणेही मारले

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही धोका आहे, हा राजकीय बळू ठरू नये, भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.