AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीत युती केली ही एकच गोष्ट चुकली, भाजपला 150 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय (Devendra Fadnavis claim on Maharashtra Assembly Election).

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Sep 18, 2020 | 6:41 PM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युती केली ही एकच गोष्ट चुकली, भाजपला 150 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय (Devendra Fadnavis claim on Maharashtra Assembly Election). ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या व्हर्च्युअल रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या राजकीय भाकितांचा आधार घेत हे वक्तव्यं केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाऊ तोरसेकर यांनी 2013 मध्येच सांगितले होते की भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी निवडलं तर संपूर्ण बहुमत 272+ जागा भाजपला मिळतील. त्यावेळी अनेकांना हे जरा जास्त सांगत आहेत असं वाटलं, पण ते सत्य झालं. 2019 मध्ये देखील देशात अस्थिरतेचं वातावरण होतं. बिहार आणि दिल्लीसारखी एखादी निवडणूक हरलो होतो. अशावेळी अनेकांना वाटत होतं नकारात्मक वातावरण आहे. अनेक पक्ष एकत्र झाले होते. त्यावेळी देखील भाऊ तोरसेकर यांनी भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असं सांगितलं होतं. ते देखील सत्य झालेलं आपण बघितलं.”

“खरं म्हणजे एकच गोष्ट आपली चुकली. भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेच्या आधी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी भाजपला पर्याय दिले होते. भाजप 150+ किंवा युती 200+. त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय स्वीकारला नसता तर भाऊ तोरसेकर यांचं तिसरं भाकित देखील खरं ठरलं असतं,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

“मोदींनी राष्ट्रवादाला खऱ्या अर्थाने कर्तृत्वाची जोड दिली”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोदींनी सामान्य लोकांसाठी काम करुन भारताचा जीडीपी सर्वात जास्त होईल असं काम केलं. पंतप्रधान आवास योजना, शौचालय आणि सर्वसामान्य जनतेच्या उपयुक्त योजनांना त्यांनी प्राधान्य दिलं. देशाच्या आर्थिक उत्पन्नापेक्षा सर्वसामान्यांना रोजगार कसा मिळेल याकडे मोदींनी लक्ष दिलं. कोरोनाच्या काळात देखील केवळ मोदींमुळे विदेशी गुंतवणूक झाली. मोदींनी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणारा निर्णय घेतला. शेतकऱ्याला हमीभाव असेल यासाठी त्यांनी काम केलं. ते स्वामिनाथन आयोगाच्या अहवालावर काम करणारे नेते आहेत.”

संबंधित व्हिडीओ :

Devendra Fadnavis claim on Maharashtra Assembly Election

BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...