मुख्यमंत्र्यांचं मौन चिंताजनक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं; फडणवीसांचा चिमटा

यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली.  (Devendra fadnavis Comment)

मुख्यमंत्र्यांचं मौन चिंताजनक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं; फडणवीसांचा चिमटा
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 1:23 PM

मुंबई : “गेल्या काही दिवसात ज्या घटना समोर येतात, त्या अत्यंत चिंताजनक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे चिंताजनक आहे. जर मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलत करावं, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. नुकतंच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर विविध आरोप केले. (Devendra fadnavis Comment after Governor Bhagat Singh Koshyari Meet)

मुख्यमंत्र्यांचे मौन, काँग्रेस अस्तित्वहीन

गेल्या काही दिवसात ज्या प्रकारच्या घटना बाहेर येतात. त्या अत्यंत चिंताजनक आहेत. या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे त्याहून चिंताजनक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोन प्रेस घेतल्या. पण त्यात त्यांनी गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम केले. तर काँग्रेस ही अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगळं बोलतात, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी बोलत करावं

“महाविकासआघाडीने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्या पलीकडे काहीही नाही. काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो हे देखील त्यांनी सांगावे. राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी बोलत करावं. खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे,” अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.  (Devendra fadnavis Comment after Governor Bhagat Singh Koshyari Meet)

राऊत मोठे नेते नाहीत

“काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर आले. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? तसेच 25 ऑगस्ट 2020 पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला,” असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

मुख्यमंत्री हे प्रमुख आहे. त्यांनी बोललं पाहिजे. पण त्यांना माहिती आहे की या मुद्द्यावर बोलणे कठीण आहे. पण त्यांना माहिती आहे की यावर बोललं तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाही. ते काही सरकार व्यक्ती नाही. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत,” असेही फडणवीस म्हणाले.

हफ्ता वसूली केली तर शिवसेनेचा एजंट आहे का?

“जर कोणत्या अधिकाऱ्याने खरे सांगितले तर तो भाजपचा एजंट ठरतो आणि जर हफ्ता वसूली केली तर तो काय शिवसेनेचा एजंट आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारांची भेट

भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात सकाळी 9.30 वाजता दाखल झाले. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी आहेत. जवळपास तासाभर भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबतं सुरु होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. (Devendra fadnavis Comment after Governor Bhagat Singh Koshyari Meet)

संबंधित बातम्या

BJP Delegation Meet Governor | भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, तासाभरापासून बैठक

फडणवीस बॉम्ब घेऊन आले, तो भिजलेला लवंगी फटाका निघाला, त्याला वातही नव्हती; राऊतांची खोचक टीका

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.