“मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही, नया है वह” आदित्य ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना 'नया है वह' म्हणत टोला लगावला (Devendra Fadnavis Cricize Aaditya Thackeray).

“मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही, नया है वह आदित्य ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 5:23 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ म्हणत टोला लगावला आहे (Devendra Fadnavis Cricize Aaditya Thackeray). देवेंद्र फडणवीस यांनी आज (12 जून) पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला (Devendra Fadnavis Cricize Aaditya Thackeray).

“नया है वह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. त्यामुळे ठिक आहे. ते नवीन आहेत, बोलत आहेत. मला असं वाटतं, माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काही प्रतिक्रियादेखील देऊ नये”, अशी टीप्पणी फडणवीसांनी केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोरोना संकटात विरोधी पक्षाचे नेते सर्वसामान्यांना मदत करण्याऐवजी हेल्थ टूरिज्म किंवा डिझॅस्टर टूरिज्म म्हणून फिरत आहेत. मात्र, आम्ही तसं करत नाही. आम्ही लोकांची मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहोत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

दरम्यान, देवेद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊतांवरही निशाणा साधला. “सरकार पाडताय, असा आपणच कांगावा करायचा. त्याच विषयावर मुलाखती करायच्या आणि त्यावरच बोलायचं, जेणेकरुण खरी जी कोरोनाची लढाई आहे, कोरोनाचे जे प्रश्न आहेत ते दूर होतील, असा हा प्रयत्न आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

संबंधित बातमी :

कांगावा नको, सरकार पाडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही, फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...