आम्ही सरकार पाडणार नाही, तुम्हीच ते चालवून दाखवा : देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडीवर सडकून टीका केली आहे (Devendra Fadnavis criticize Thackeray Government).
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडीवर सडकून टीका केली आहे (Devendra Fadnavis criticize Thackeray Government). महाविकासआघाडीचं ठाकरे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, तर धोक्याने आलेलं सरकार आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच हे सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही, तुम्हीच किमान हे सरकार चालवून दाखवा, असं आव्हान दिलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकासआघाडीचं ठाकरे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, तर धोक्याने आलेलं सरकार आहे. हे सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही. तुम्ही एकमेकांची तंगडी ओढायला सक्षम आहात. पण तुम्ही किमान सरकार चालवून दाखवावं. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे.”
“कोरोना टेस्टिंग वाढवा आम्ही सांगत आहोत, मात्र आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही सर्वात जास्त टेस्टिंग करत आहोत, पण महाराष्ट्र्र याबाबत 19 व्या क्रमांकावर आहे. मुंबईत टेस्ट होत नाहीत, कारण त्यावर निर्बंध घातले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत लक्ष घातल्यानंतर मृत्यूदर कमी झाला. दुसरी लाट आली नाही, तर एका महिन्यात मुंबईत परिस्थिती आटोक्यात येऊ शकते,” असा दावाही फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीस, “शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यांचा आक्रोश वाढत आहे. कुणाच्या काळात किती मृत्यू, यावर मी विश्वास ठेवत नाही मात्र शेतकऱ्यांना आपण मदत करत आहोत का? शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, कापूस खरेदीही होत नाही. दुधामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना रोज थोडे पैसे मिळतात.”
“आम्ही वर्षभर अनुदान दिले, भुकटीसाठी अनुदान दिले, हजार कोटी अनुदान राज्याने आमच्या काळात दिले. 7 लाख लिटर दूध कुणाचं विकत घेतलं, ते सांगा, कोणत्या डेरीचे मालक आहेत त्यांची माहिती द्या, बांधावर बियाणे देऊन खत देणार, मात्र सरकारी बियाणंच खोटं निघालं” असा घणाघातही देवेंद्र फडणवीसांनी केला.
“काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचं आणि केंद्राने पैसे दिले तर त्याचा वापर करायचा नाही. हे जे थोबाड फोडून बोलत होते की पीएम केअरचा पैसे नाही, मात्र आता आरटीआयमधून ही माहिती समोर आले” असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
- ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग उद्धवजींच्या हातात आहे, पण मागे बसलेले ठरवतात कुठे जायचं असतं
- भाजपचे तीस कार्यकर्ते कोरोनाच्या संकटात बळी पडले
- भाजप कोरोनाच्या संकटात देशसेवा जनसेवा करत पुढे जाणार
- आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा
- तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात
- हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, हे धोक्याने आलेलं सरकार आहे
- आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे
- कोरोनाचे संकट कोणत्या राज्यावर आणि पक्षाचं संकट नाही
- तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे
- टेस्टिंग वाढवा आम्ही सांगत आहोत, आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही सर्वात जास्त टेस्टिंग करत आहोत, पण महाराष्ट्र्र 19 व्या क्रमांकावर
- मुंबईत टेस्ट होत नाहीत, कारण त्यावर निर्बंध घातले आहेत
- अमित शाह यांनी दिल्लीत लक्ष घातल्यानंतर मृत्यूदर कमी झाला आहे
- सेकंड वेव्ह आली नाही, तर एका महिन्यात मुंबईत परिस्थिती आटोक्यात येऊ शकते
- हे सरकार पुण्यावर लक्ष देत नाही, पिंपरी चिंचवडला मदत देत नाही
- तुम्ही जर मदत केली नाही तर लोकांना खूप अडचण आहे
- आम्ही सरकारच्या सोबत आहोत मात्र ही लपवालपवी थांबवा
- शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यांचा आक्रोश वाढत आहे. कुणाच्या काळात किती मृत्यू, यावर मी विश्वास ठेवत नाही मात्र शेतकऱ्यांना आपण मदत करत आहोत का?
- शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, कापूस खरेदीही होत नाही
- दुधामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना रोज थोडे पैसे मिळतात. आम्ही वर्षभर अनुदान दिले, भुकटीसाठी अनुदान दिले, हजार कोटी अनुदान राज्याने आमच्या काळात दिले
- काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचं आणि केंद्राने पैसे दिले तर त्याचा वापर करायचा नाही
- हे जे थोबाड फोडून बोलत होते की पीएम केअरचा पैसे नाही, मात्र आता आरटीआयमधून ही माहिती समोर आले
- 7 लाख लिटर दूध कुणाचं विकत घेतलं, ते सांगा, कोणत्या डेरीचे मालक आहेत त्यांची माहिती द्या
- बांधावर बियाणे देऊन खत देणार, मात्र सरकारी बियाणंच खोटं निघालं
हेही वाचा :
रिक्षाचं स्टिअरिंग उद्धवजींच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात : फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी वाढदिवशी मराठा समाजासोबत असल्याचा विश्वास द्यावा, आशीर्वाद मिळेल : विनायक मेटे
Devendra Fadnavis criticize Thackeray Government