AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवालही त्यांनी केलाय. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना, शेतकरी, मराठा, ओबीसी आरक्षण, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

'मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे', फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Updated on: Jun 24, 2021 | 4:08 PM
Share

मुंबई : पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला. म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केलाय. ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवालही त्यांनी केलाय. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना, शेतकरी, मराठा, ओबीसी आरक्षण, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray in BJP executive meeting)

महाराष्ट्रात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. राज्याच्या इतिहासात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचाराने बरबटलेलं सरकार आहे. अशी अवस्था गेल्या 60 वर्षात पाहिली नाही. कुठल्याही सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री असतो, पण या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री समजतो, एक निर्णय घेतला जातो, तो तासाभरात रद्द होतो, मग दुसऱ्यादिवशी पुन्हा निर्णय घेतला जातो, सरकार आहे की सर्कस आहे? असा खोचक सवालही फडणवीसांनी विचारलाय.

‘हे कुठलं कोरोना मॉडेल?’

कोव्हिडमुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर, महाराष्ट्रात देशातले मृत्यू 33 टक्के, ॲाक्सिजन नाही म्हणून लोकं मेली, या सरकारची पाठ थोपटतात त्यांना विचारावं वाटतं तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कोरोना मुक्तीचं कुठल मॅाडेल आणलंय, कुणी आणलंय, कसं आणलंय, देशात कोव्हिडमुळे मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती महाराष्ट्रातील आहे. किड्या मुंग्यासारखे लोक मेले. उत्तर प्रदेशात गंगा नदीत मृतदेह आढळले म्हणून गोंधळ माजवला, पण बीडमध्ये एका रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबले, हे मॉडेल कुठलं? असा सवालही फडणवीसांनी केलाय.

‘..आणि म्हणून अधिवेशन गुंडाळण्याचा डाव’

मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये एक कोविड सेंटर या सरकारनं काढलं का दाखवा? कोरोना काळात प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळाल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय. राज्यात फक्त वसुली सरकार, 100-100 कोटी रूपयांच्या वसुली, पोलिसातला वाझे सापडला, अजून वेगवेगळ्या विभागातले वाझे आहेत, त्यांचे पत्ते आम्हाला सापडले आहेत, आमच्याकडे त्यांचे पत्ते आलेत, त्यामुळे अधिवेशन गुंडाळलं. अधिवेशनापासून हे सरकार पळ काढतंय कारण असं केलं तर आपला भ्रष्टाचार बाहेर येईल, असा दावाही फडणवीसांनी केलाय.

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार

मी दाव्याने सांगतो, कुठल्याही मंत्र्याने माझ्याशी डिबेट करावी, ओबीसी आरक्षण जायला फक्त या सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार. पिटीशन टाकणारे कोण, एक काँग्रेस आमदारांचा मुलगा आणि एक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, ती पिटीशन हायकोर्टात आलं. पिटीशन ५० टक्क्यावरील आरक्षणाबाबत होती, बावनकुळेंना इन्चार्ज केलं, ५० टक्क्यांवरील आरक्षण आम्ही टिकवलं. मग ते सुप्रीम कोर्टात गेले. तिथे आम्ही म्हणणं मांडलंच, पण निवडणुका घेण्याचीही परवानगी पूर्ण आरक्षणासहित देण्यात आली. ५० टक्क्यावरील आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण थंबरुल होऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं. आम्ही एका रात्रीत अध्यादेश काढला, तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला.

संबंधित बातम्या :

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार, आशिष शेलारांचा हल्लाबोल

मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाडांची गुप्त बैठक, तब्बल दोन तास चर्चा

Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray government in BJP executive meeting

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.