…नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल : देवेंद्र फडणवीस
आमची रेषा मिटवू नका, नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल," असा इशाराही फडणवीसांनी (Devendra Fadnavis Criticizes Government) दिला.
भिवंडी : “आम्ही केलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ शकत नाही. कामाचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर जनता सुज्ञ आहे. ते ज्याचे त्याचे माप त्याच्या पदरात टाकते,” असे खोचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis Criticizes Government) केले. खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीतील अंजुर येथे आयोजित अभिष्टचिंतन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
“आमच्या विकासाच्या रेषेपेक्षा मोठी (Devendra Fadnavis Criticizes Government) रेष मारा. आमची रेषा मिटवू नका, नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल,” असा इशाराही फडणवीसांनी दिला.
“विकास हा कोणीही थांबवू शकत नाही. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खंबीर राहावं. आपल्या जिल्ह्याचा विकास आम्ही केंद्राच्या माध्यमातून करु,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“जनतेचा जनमताचा नेता, युवकांना लाजवेल अशी तत्परता, कपिल पाटील यांनी भव्यदिव्य आयोजन करावे,” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी कपिल पाटील यांच्याबद्दल बोलताना केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी कपिल पाटील चषक स्पर्धेतील भव्य दिव्य बक्षिसांची प्रशंसा केली. त्यावेळी 26 बाईक, एवढी बक्षीस राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडू निर्माण होवोत, असेही फडणवीस म्हणाले.
विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धेत फडणवीसांनी स्वतः क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. खासदार कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना चांदीची तलवार सन्मान करण्यात आला.
“राज्य सरकारकडून विविध कामांचे श्रेय घेताना ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रोच्या श्रेयाचे बॅनर लावले आहेत. पण जनतेला माहिती आहे भिवंडी-कल्याण मेट्रोचे श्रेय फडणवीसांचे आहे. ते कोणीही हिरावू शकत नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघात फडणवीस सरकारने योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. पण हे स्थगिती सरकार त्यात खोडा घालण्याचे काम करीत आहे,” असे कपिल पाटील (Devendra Fadnavis Criticizes Government) म्हणाले.