‘मंत्री टीव्हीवर घोषणा करतात, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खडकू मिळत नाही’, फडणवीसांचा घणाघात

अतिवृष्टीमुळे पिकांचं आणि जमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. आस्मानी संकटात शेतकरी आता सरकारी मदतीची आस लावून बसला आहे. मात्र, मागील दोन वर्षात आलेल्या आपत्तीमध्ये राज्य सरकारने म्हणावी तशी मदत केलेली नाही, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केलीय.

'मंत्री टीव्हीवर घोषणा करतात, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खडकू मिळत नाही', फडणवीसांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 3:51 PM

नागपूर : गुलाब चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात आणि खास करुन दुष्काळी मराठवाड्यात आता ओल्या दुष्काळाचं संकट ओढावलं आहे. ढगुफुटीसदृष्य पावसामुळे मराठड्यातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. वातावरणातील बदलामुळे अतिवृष्टीचं संकट ओढावलं आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं आणि जमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. आस्मानी संकटात शेतकरी आता सरकारी मदतीची आस लावून बसला आहे. मात्र, मागील दोन वर्षात आलेल्या आपत्तीमध्ये राज्य सरकारने म्हणावी तशी मदत केलेली नाही, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केलीय. ते आज नागपुरात बोलत होते. (Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government over farmers’ issue)

सरकारकडून फक्त घोषणा होतात. मंत्री टीव्हीवर घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना खडकूही मिळत नाही. राज्य सरकारनं बळीराजाच्या पाठीशी उभं राहावं, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारनं कुठल्याही शहराला एक पैसाही दिला नाही. आम्ही दिलेल्या पैशावर आजही विकासकामं सुरु आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केलीय.

‘हे सरकार काही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही’

आपलं सरकार येईल तेव्हा शेतकऱ्यांना नक्की मदत करु. हे सरकार काही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आज ना उद्या आमचं सरकार नक्की येईल, असा दावाही फडणवीस यांनी केलाय. त्याचवेळी आता टीव्हीवाले चालवतील की फडणवीस बोलले आमचं सरकार येईल म्हणून. पण आज येईल, एक वर्षाने येईल किंवा 2024 ला येईल. पण आमचं सरकार नक्की येईल, अशी मिश्किल टिप्पणीही फडणवीस यांनी केली.

‘पंचनामे होत राहतील, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या’

दरम्यान, माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पंचनामे होत राहतील, पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.

सर्व घोषणा हवेत विरल्या

राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरही टीका करतील

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षव नाना पटोले यांच्या एका टीकेवर प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. नाना पटोले हे काहीही बोलत असतात. त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते अमेरिकेच्या अध्यक्षांवरही टीका करतील. त्यामुळे त्यावर बोललचं पाहिजे का?, असा सवालही त्यांनी केला.

इतर बातम्या :

किरीट सोमय्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नाही- जयंत पाटील; देवेंद्र फडणवीसांनाही टोला

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात लवकरच केव्हाही निवडणूक लागू शकते : आशिष शेलार

Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government over farmers’ issue

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.