Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सह्याद्रीचं पाणी आणल्यास दुष्काळ संपेल, या सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय : देवेंद्र फडणवीस

जर मराठवाड्यात सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो," असेही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On criticism Thackeray Government)

सह्याद्रीचं पाणी आणल्यास दुष्काळ संपेल, या सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 11:40 AM

औरंगाबाद : “महाविकासआघाडी सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाही. मराठवाडा आणि विदर्भाला पैसे देण्याचे राज्यपालांचे बंधन या सरकारने संपवले आहे. त्यामुळे या सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय झाला आहे,” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. “जर मराठवाड्यात सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो,” असेही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On criticism Thackeray Government)

विधानसभेच्या पदवीधर निवडणुकीसाठी औरंगाबादेतील प्रचारसभेदरम्यान फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर समाजसेवक, संस्थचालक यांसारख्या प्रतिष्ठित मतदारांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी फडणवीसांनी प्रतिष्ठित मतदारांशी संवाद साधला.

“ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाही. मराठवाडा आणि विदर्भाला पैसे देण्याचे राज्यपालांचे बंधन या सरकारने संपवले आहे. त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय  होत आहे. जर मराठवाड्यावर अन्याय झाला तर त्यांना मतदार सोडणार नाही हे या निवडणुकीतून दाखवून दिलं पाहिजे,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

“मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही. केंद्राच्या निधीतून विकास केला. यावेळी मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या. यात मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना केली. पण या योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे काम ठप्प झाले आहे,” अशी टीका फडणवीसांनी केली.

“समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी बकेटमध्ये आणण्यासाठी योजना केली. त्यासाठी निधीची तरतूद केली. पण तेही काम बंद पडलेलं आहे. मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकरी आणि इंडस्ट्रीवर परिणाम होतो. सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो,” असेही फडणवीस म्हणाले.

“औरंगाबादला आम्ही 1680 कोटी पाण्यासाठी दिले. या शहरातील रस्त्यांसाठी खूप निधी दिला. आता रस्ते तयार झाले आहेत. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली,” असा टोलाही फडणवीसांनी लगावला.(Devendra Fadnavis On criticism Thackeray Government)

संबंधित बातम्या : 

बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…, मनसेचे जोरदार टीकास्त्र

ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाही, बाळासाहेबांचे नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचे काम सुरु : फडणवीस

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.