Video: सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी, अजितदादांना मानलंच पाहिजे, फडणवीसांच्या ‘हिशेबा’वर भास्कर जाधवांचीही मिश्किल दाद

आशिष शेलार तालिका अध्यक्ष म्हणून बसलेल्या भास्कर जाधव  (Bhaskar Jadhav) यांच्याकडे हातवारे करुन त्यांना मागच्या सरकारच्या काळात अशी स्थिती नव्हती अशी आठवण करुन देत होते.

Video: सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी, अजितदादांना मानलंच पाहिजे, फडणवीसांच्या 'हिशेबा'वर भास्कर जाधवांचीही मिश्किल दाद
फडणवीसांच्या हिशोबावर भास्कर जाधव यांची हसून दादImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 9:33 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीला सर्वाधिक, त्यानंतर काँग्रेसला आणि सर्वात कमी निधी शिवसेनेला (Shivsena) कसा मिळाला हे स्पष्ट केलं. हे सांगताना फडणवीसांनी सभागृहात आकडेवारीच सादर केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचाही प्रयत्न केला. अजितदादांना मानलंच पाहिजे. ते डंके की चोटपर काम करतात. मागच्यावेळीही त्यांनी हेच केलं होतं. असं ठाम काम पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस ही अर्थसंकल्पातील आकडेवारी मांडत असताना त्यांच्या मागं बसलेले आशिष शेलार तालिका अध्यक्ष म्हणून बसलेल्या भास्कर जाधव  (Bhaskar Jadhav) यांच्याकडे हातवारे करुन त्यांना मागच्या सरकारच्या काळात अशी स्थिती नव्हती अशी आठवण करुन देत होते.

पाहा व्हिडीओ:

आशिष शेलार यांचे हातवारे, भास्कर जाधवांची मिश्किल दाद

देवेंद्र फडणवीस यांचं अर्थसंकल्पावर भाषण सुरु असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते. भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष असतानाचं पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्या आमदारांमध्ये आशिष शेलार यांचा देखील समावेश होता. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या खात्यांना किती टक्के निधी मिळाला हे सागंताच. त्यांच्या मागील बाकावर बसलेल्या आशिष शेलार यांनी अध्यक्ष महाराज, बघा समतोल असं म्हणत भास्कर जाधव यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी भास्कर जाधव यांनी हसून दाद दिली.

कोणत्या पक्षाच्या खात्यांना किती पैसे मिळाले?

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला, असं म्हटलं. या अर्थसंकल्पाचं आकारमान 5 लाख 48 हजार 747 कोटी इतकं आहे. त्यापैकी राष्ट्रवादीच्या खात्यांना 3 लाख 14 हजार 820 म्हणजे 57 टक्के निधी देण्यात आला. काँग्रेसच्या खात्यांना 1 लाख 44 हजार 193 कोटी देण्यात आले. म्हणजे 26 टक्के निधी दिला गेला. शिवसेनेला 90 हजार 181 कोटी म्हणजे 16 टक्के निधी दिला गेला. परब साहेब लक्षात घ्या, विशेष म्हणजे जिथे पगार द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाहीये. ती खाती काँग्रेसकडे आहेत. शिक्षण विभाग काँग्रेसकडे आहे. तर उच्च शिक्षण विभाग शिवसेनेकडे आहे. तरीही शिवसेनेला त्याची काळजीच नाही. ज्यांना काळजी आहे त्यांच्यासाठी सांगतो. अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोटपर त्यांनी काम केलं. मागच्यावेळी हेच केलं. यावेळीही हेच. असं पाहिजे काम. एकदम ठाम. सर्व पैसा राष्ट्रवादीकडे. म्हणजे 57 टक्के निधी राष्ट्रवादीकडे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले.

कसली पंचसूत्री?

अजितदादा, पैसा देताना राष्ट्रवादीसाठी कसा जोरात राखून ठेवता. तुम्ही दोनदा घोषणा केली. 500 ते 700 रुपये भरले तरी मे पर्यंत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापणार नाही, असं तुम्ही म्हटलं होतं. कुठे गेली तुमची घोषणा? तुमच्या पंचसूत्रीत पाणी दिसतंय, पीक दिसतंय आणि वीज नाहीये. कसली पंचसूत्री? शेतकरी पंचतत्त्वात विलीन होतोय आणि कसली पंचसूत्री. गावोगावी हा आक्रोश वाढतोय, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या:

किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडला! वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला

अमजद खान, निजामुद्दीन शेख, हिना साळुंखे कोण आहेत माहितीय का? राज्यातल्या नेत्यांच्या फोन टॅपिंगची मोडस ऑपरेंडी सभागृहानं ऐकली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.