Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले…

संजय राऊतांच्या आरोपांबाबत विचारलं असता अशा लवंड्यांबाबत मी जास्त बोलत नाही, अशा शब्दात राज यांनी राऊतांना टोला हाणला. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत फ्रस्टेटेड व्यक्ती आहेत, ते दिवसभर काहीतरी बोलत राहतात, असं प्रत्युत्तर दिलंय.

Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले...
देवेंद्र फडणवीस, संजय राऊतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 5:13 PM

पुणे : राज्याच्या आणि देशात शनिवारी हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. महाराष्ट्रात तर राजकीय हनुमान जयंतीने जोर धरला होता. अशावेळी दिल्लीतील जहांगीर पुरी परिसभात शोभायात्रेवर मोठी दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि जाळफोळ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाव न घेता भाजप आणि मनसेवर गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, असा दावाच राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या आरोपांवर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार निशाणा साधलाय. संजय राऊतांच्या आरोपांबाबत विचारलं असता अशा लवंड्यांबाबत मी जास्त बोलत नाही, अशा शब्दात राज यांनी राऊतांना टोला हाणला. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत फ्रस्टेटेड व्यक्ती आहेत, ते दिवसभर काहीतरी बोलत राहतात, असं प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊतांचा नेमका आरोप काय?

महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रातील जनता अत्यंत सूज्ञ आहे, सावध आहे. संयमी आहे आणि ज्ञानी आहे. देशभरातील हा व्यापक दंगलीचा कट आहे. जे दिल्लीत घडलंय ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पण तो यशस्वी होणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. तसंच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. प्रत्यक्ष अयोध्येच्या युद्धभीमवर शिवसेना होती. रणांगणावर आम्ही होतो. आता मंदिर उभं राहतंय. आता प्रसाद मिळतो. काही लोकं प्रसादाला जातात. आम्ही रणागणांवर जातो. कुणाला इच्छा झाली असेल तर नक्कीच जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यावं. अयोध्या सगळ्यांची आहे, असा चिमटा त्यांनी काढलाय.

संजय राऊत फ्रस्टेटेड – फडणवीस

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात काही गैर नाही. प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला कुणीही जाऊ शकतं. संजय राऊत हे फ्रस्टेटेड व्यक्ती आहेत. ते दिवसभर बोलत राहतात. ते मोकळे आहेत, त्यांना काम नाही. आम्हाला भरपूर कामं आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.

‘लवंड्यां’बाबत जास्त बोलत नाही- राज ठाकरे

अशा लवंड्यांबाबत मी जास्त बोलत नाही. ज्यावेळेला आमच्याकडून मिरवणुका निघतात. त्या मिरवणुकांवर दगडफेक होणार असेल तर आम्ही काही शांत बसणार नाही. आमचे हात काही बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो. पुढच्या हातात जे कुठलं हत्यार असेल तर आमच्या हातात द्यायला लावू नका, असं राज ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या : 

Raj Thackeray : ‘बाळासाहेबांचं रेकॉर्ड कुणीही मोडू शकत नाही’, चंद्रकांत खैरेंचा राज ठाकरेंना टोला; तर औरंगाबादेत राज यांच्या सभेची जय्यत तयारी

Ayodhya Hindutva Politics : राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा धसका? आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्येला जाण्याच्या तयारीत

Video : ‘राष्ट्रवादी पुन्हा’वर दत्तात्रय भरणे यांनी धरला ठेका, ‘मामां’ना कार्यकर्त्यांनी घेतलं ‘डोक्या’वर!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.