Devendra Fadnavis : फडणवीसांनी BMC तील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला! फडणवीसांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची मालिकाच फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली.

Devendra Fadnavis : फडणवीसांनी BMC तील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला! फडणवीसांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्देImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 6:02 PM

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुंबईसाठी राज्य सरकारनं केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गरिबांसाठी, सफाई कामगारांसाठी आणि आमदारांसाठी हक्काच्या घरांचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची मालिकाच फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. यात कोविड सेंटर, औषध खरेदी, नालेसफाई, आदी प्रकरणातील घोटाळ्यांचे मोठाले आकडेच फडणवीसांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावरील आयकर विभागाच्या धाडीत समोर आलेल्या मालमत्तांचा उल्लेख करत फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र डागलं. फडणवीसांचं हे भाषण म्हणजे सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांची कॅसेटच असल्याचं दिसून आलं. तर फडणवीसांच्या या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे आपण पाहूया.

  1. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, “आमचे मुख्यमंत्री म्हणतात, की प्रश्न विचारायला अक्कल थोडी लागते. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही उगीच 20 – 22 वर्ष तारांकित-अतारांकित प्रश्न विचारत राहिलो. आधीच हे समजलं असतं, तर नसते विचारले. काहींना संसदेत संसदरत्न पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल. पण आज आम्हाला समजलं, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही”.
  2. ‘आमची चूक झाली की आम्ही मविआ म्हणजे महाविकास आघाडी समजलो. मग लक्षात आलं की ही महाविनाश आघाडी आहे. नंतर समजलं ही तर महावसुली आघाडी आहे. पण अलिकडच्या काळात ही मद्यविक्री आघाडी झाली आहे. किती दूरचा विचार करुन तुम्ही मविका हे नाव ठेवलं. कारण, पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यापेक्षा तुम्ही दारुवरील कर निम्म्याने कमी केला. कोरोना काळात मंदिरं बंद पण मदिरालय सुरु होती. क्लास बंद होते पण ग्लास सुरु होते’.
  3. महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र करण्याचं काम चाललं आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांना सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी आपण किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला. प्रश्न विचारला अक्कल लागत नाही पण येतात आमच्या मनात प्रश्न. ड्राय डेला किराणा दुकान, सुपरमार्केट सुरु राहणार का? आता गाडी चालवताना दारू पिऊन गाडी चालवत असतील तर फाईन लागणार नाही का? का कारण एक प्रवक्ते म्हणतात की वाईन म्हणजे दारू नाही. वाईनचा निर्णय शेतकऱ्यांना मदत म्हणून घेतला गेला असं सांगतात. मग जाहीर केलेली हेक्टरी 50 हजाराची मदत द्यायला हवी होती.
  4. मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे.
  5. सफाई कामगाराच्या नावावर आपल्या तिजोऱ्या कशा भरल्या हे अमित साटम तुम्हाला व्यवस्थित सांगतील. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा, संचालन कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात सुद्धा घोटाळा, डेडबॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेसमास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकार्‍यांच्या कंपन्यांनाच कामे, रेमडेसिवीर खरेदी घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चरभरणी घोटाळा, आश्रय योजनेत घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई-टेंडरमध्ये घोटाळा, नालेसफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पम्पिंग स्टेशनमध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीत घोटाळा, केईएम रूग्णालयात भ्रष्टाचार, बेस्टच्या डिजिटल तिकिट निविदात घोटाळा, विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतही घोटाळा, बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, अशी घोटाळ्यांची मालिकाच फडणवीसांनी आपल्या भाषणात वाचून दाखवली.
  6. मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे. यावर आम्ही बोललो तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू. म्हणजे मुंबईला लुटून खाणारे हितचिंतक दैवत.. आणि विरोधात बोलणारे शत्रू? पण आता प्रत्येकाच्या लक्षात आलं आहे की कोण आपला शत्रू आहे? कोण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खातंय.
  7. पाच कोविड सेंटरचा 100 कोटीचं कंत्राट पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिलं. कागदपत्र चार दिवसांत तयार केली गेली. रेप्युटेड कंपन्यांची नावाशी साधर्म्य असलेली नावं दिली गिली. पण स्टॅम्प पेपर जुने, त्यात काटछाट केली गेलीय. अनुभव नसलेल्या लोकांना काम द्यायचं. त्या ठिकाणी रुग्ण आला की नाही त्याला 50 टक्के रक्कम दिली गेली. कारण, आपल्याच कुणालातरी कोविड सेंटर देण्यात आली होती. दादा तुम्ही पुण्यातून 15 दिवसांत हाकललं त्यांनाच मुंबईत 5 कोविड सेंटरचं कंत्राट देण्यात आलं. पण त्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही.
  8. मला आश्चर्य वाटतं की कोविडच्या काळातही इतके भयानक घोटाळे होत असतील तर काय म्हणावं. सप्टेंबर 2020 परिस्थिती सांगतो की वजन पडल्याशिवाय फाईलीच हालत नव्हत्या. गरिबांसाठी औषध खरेदीसाठी आयुक्तांना पत्र पाठवलं 15 महिन्यात 18 स्मरणपत्र पाठवली. वर्षभरानंतर फाईल गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं. मग पुन्हा वेगळं पत्र… ही फाईल नेमकी कशाटची वाट पाहत होती हे वेगळं सांगायला नको. 10 शेड्यूलची अशीच अवस्था आहे. महापालिकेला सर्वात जास्त इंटरेस्ट कशात तर पेन्ग्विनमध्ये. मुंबईची रंगरंगोटी, चांगली गोष्ट आहे. पण मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गरीब माणसाला उपचारासाठी आपण काही देत नसू तर त्याचा उपयोग काय.
  9. काय सुंदर कल्पना असते.. माहुल पंपिंग स्टेशनसाठी अजमेरा बिल्डर. पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी अजमेराचाच भूखंड कसा उपयुक्त आहे हे सांगण्यात आलं. जो भूखंड सीआरझेड अंतर्गत असल्यानं त्यावर बांधकाम करता येत नव्हतं. मग महापालिकेचा उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड अजमेराला देण्यात आला. महापालिकेत आम्ही आणि काँग्रेसनं विरोध केला पण काही फायदा नाही.
  10. मुंबई महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे सुरुवातीला 130 कोटींची संपत्ती सापडली. आता ती 300 कोटीपर्यंत पोहोचलीय. त्यांनी 24 महिन्यात 38 मालमत्तांची खरेदी केलीय. कोरोनाने लोक मरत होते. पण यांनी 24 महिन्यात 38 संपत्ती खरेदी केल्या. भ्रष्टाचार किती बोकायलाय! एक लिपीक जिल्हा उपनिबंधकांना लाच मागतो. सोलापूरमध्ये एका पत्रकारानं स्टिंग ऑपरेशन केलं. महिन्याकाठी 60 लाख गोळा केले जात आहेत.

इतर बातम्या : 

Video: ‘तेच मूर्ख, तेच शहाणे’ आघाडी सरकारच्या कारभाराचे फडणवीसांकडून चपखल शब्दात वाभाडे !

Devendra Fadnavis : मुंबई मेली तरी चालेल, ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची न संपणारी यादी फडणवीसांनी वाचली, मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.