वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस
Maharashtra Budget Session Live 2021 देवेंद्र फडणवीस यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडल. (Devendra Fadnavis Aaditya Thackeray)
Maharashtra Budget Session Live 2021 मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथं त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो नाईटलाईफला नसतो, असा टोला देखील त्यांनी लगावला. (Devendra Fadnavis slams Aaditya Thackeray on Night Life in Worli)
अनेक मंत्री हे स्वत:ला मुख्यमंत्री समजतात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. म्हणून त्यांचेच मंत्री त्यांचे नियम धुडकावतात. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचं तिथली लोक सगळं एैकतात. म्हणूनच त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे नाईटलाईफ पणे सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोरोना फक्त शिवजयंतीसाठी?
देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना हा फक्त शिवजयंतीसाठी आहे मात्र नाईटलाईफसाठी नाही का?,असा सवाल उपस्थित केला. अधिवेशनाच्या वेळी कोरोना असतो आणि नाईट लाईफलला नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांची वरळी नाईटलाईफवर जोरदार टीका केली.
काँग्रेसचा सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. काँग्रेसला विरोधी पक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत मीडिया इवेंट ते करत आहेत. वीज बिलाचा मुद्दा महत्वाचा आहे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राज्यात यापूर्वी कधी झाली नाही.अतिवृष्टीची मदत झाली नाही. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर राज्य सरकारला घेरणार आहोत.
मोहन डेलकर यांची आत्महत्या दुर्दैवी आहे. पूजा चव्हाणची आत्महत्या देखील दुर्दैवी आहे. कालच्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्र्यांची परिस्थिती केविलवाणी पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांनी केवळ ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडलं ते खरं की खोट याबाबत उत्तर द्यावं.मराठा आरक्षणप्रश्नी विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे. नरेंद्र मोदी यांनी जी लोकं कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरवत होती त्यांना उत्तर दिलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला वेग मिळणार आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर 27 रुपये कर, नऊ राज्यांत इंधन स्वस्त, फडणवीसांनी गणित मांडलं https://t.co/QYCSuR6YkM @Dev_Fadnavis | @BJP4Maharashtra | #PetrolDiesel | #PetrolTax | #DevendraFadnavis |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra budget session 2021 LIVE | तुमची नैतिकता जनता ठरवेल, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
(Devendra Fadnavis slams Aaditya Thackeray on Night Life in Worli)