Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधी तरी आत्मचिंतन करा; फडणवीसांचा सरकारला सल्ला

आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over natural calamity)

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधी तरी आत्मचिंतन करा; फडणवीसांचा सरकारला सल्ला
devendra fadnavis
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 5:44 PM

नगर: आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. आताही सवय सोडा. कधी तरी आत्मचिंतन करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारला दिला. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over natural calamity)

कोपरगाव येथे 40 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. त्यांनी कधी तरी आत्मचिंतन केलं पाहिजे. कधी काय करावं याचा विचार सरकारने केला पाहजे, असं सांगतानाच आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचं असतं, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

असं वागणं बरं नाही

चांगलं झालं आपली पाठ थोपटून घेतात. पण त्यात काही उणीव दिसली की लगेच केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकारचं असं वागणं बरं नाही, असं चिमटा त्यांनी काढला.

पीकविम्यावरून सरकारवर टीका

यावेळी त्यांनी पीकविमा योजनेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने सुरुवातीला टेंडर काढलं नाही. उशिरा टेंडर काढलं. त्यामुळे काही जिल्ह्यात टेंडरच झाले नाही. फळबागा संदर्भात यांनी अनेक निकष बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तिथे मदत मिळाली नाही. या संदर्भात गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि टेंडरही वेळेत गेले पाहिजे, असं ते म्हणाले.

आंबेडकरांना टोला

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मात्र मी ते काम कधीच सुरू केलं आहे. नागपूरला थांबून जे करायचं आहे, ते आधीच केलं. ऑक्सिजनचा साठा कमी होता, तो आणला आहे. विविध सेवाही सुरू केल्या आहेत. आम्ही जे काही केलंय, ते कदाचित आंबेडकरांपर्यंत पोहोचलं नसेल. त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोहोचवू, असं त्यांनी सांगितलं.

गेल्यावर्षी वादळामुळे मोठं नुकसान

मागच्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी राज्य सरकारने घोषित केलेली रक्कम नुकसानग्रस्तांना पोहोचली नाही. ही मदतही तुटपुंजी होती. मागच्या वर्षी वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या होत्या. यावेळी वादळात कमी नुकसान होईल, अशी अपेक्षा करुयात, असंही ते म्हणाले. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over natural calamity)

संबंधित बातम्या:

काळ आला होता, पण वेळ नाही, भलंमोठं होर्डिंग थेट पिकअपवर कोसळलं, पुढचा भाग उद्ध्वस्त, दोन जण जखमी

Cyclone in Maharashtra : सिंधुदुर्गला सर्वाधिक फटका, रस्ते बंद, बत्ती गुल, नेटवर्क गायब!

Cyclone in Maharashtra : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्या; नसीम खान यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

(devendra fadnavis slams maha vikas aghadi over natural calamity)

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....