Devendra Fadnavis : ‘ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य’, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच फडणवीसांचं ट्वीट

केंद्रीय पातळीवर सूत्रे हलली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीसांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच फडणवीस यांनी एक ट्वीट करत पक्षाचा आदेश मला शिरोधार्य असल्याचं सांगितलं.

Devendra Fadnavis : 'ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य', उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच फडणवीसांचं ट्वीट
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 8:07 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. मी सत्तेबाहेर असेल, पण सरकार चालावे ही माझी जबाबदारी असेल, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केलं. मात्र, अवघ्या काही वेळातच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माध्यमांसमोर येत फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी असा आग्रह धरला. केंद्रीय पातळीवर सूत्रे हलली, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही फडणवीसांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच फडणवीस यांनी एक ट्वीट करत पक्षाचा आदेश मला शिरोधार्य असल्याचं सांगितलं.

देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान मोदींचे 2 फोन?

मी सत्तेच्या बाहेर राहणार, पण सरकार चालावं ही माझी जबाबदारी असेल, असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. फडणवीसांच्या या घोषणेनंतर केंद्रीय भाजपमध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा आग्रह केला. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना दोन फोन केले आणि सरकारमध्ये सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर अखेर फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा – नड्डा

आम्ही पदासाठी नाही, तर विचारासाठी आहोत. विचारांना पुढे नेत असताना राज्याचा विकास व्हावा, राज्यातील जनतेचा विकास व्हावा, लोकांच्या इच्छा, मागण्या पूर्ण होवोत. या सर्व गोष्टींचा विचार करता देवेंद्र फडणवीस यांनी हा विचार केला आहे. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरवले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असायला हवे आणि सरकारमध्ये पदभार सांभाळायला हवा. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाने हे स्पष्ट सांगितले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा. महाराष्ट्रातील जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकद लावावी आणि महाराष्ट्र एक विकसित राज्य होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

 

नड्डा आणि अमित शाह यांचे ट्वीट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.