Devendra Fadnavis | “ही राजकीय भेट नाही, सरकार पाडण्यात रस नाही” फडणवीसांची अमित शाहांशी दीड तास चर्चा
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप आमदार जयकुमार गोरे, भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध विषयांवर दोघांची जवळपास दीड तास चर्चा चालली. “ही राजकीय भेट नसून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही” असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. “यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली” अशी माहिती फडणवीस यांनी भेटीनंतर पत्रकार परिषद घेत दिली. फडणवीसांसह भाजपचे महाराष्ट्रातील चार नेतेही दिल्ली दौऱ्यावर आहेत. (Devendra Fadnavis Visits New Delhi to meet Amit Shah)
“यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो. कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. “शरद पवार काय करत आहेत, म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही, केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत” असं ते म्हणाले.
“अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष आहे. पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन” असंही फडणवीस यांनी सांगितलं.
“ही राजकीय भेट नाही”
“ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली. अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही. देशात काय चालतं, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे” असंही ते म्हणाले.
“जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या” असा टोला ‘महाजॉब्स’ पोर्टलवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उडालेल्या खटक्यांवरुन फडणवीसांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस लाईव्ह
- शरद पवार काय करताहेत म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही, केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत
- जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या
- सरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न आणि रस नाही, अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं
- देशात काय चालतं, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे
- भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही
- ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली
- पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन
- अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष आहे
- कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल
- कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली
- यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा झाली
फडणवीस यांच्यासोबत साताऱ्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील आहेत. फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचीही भेट घेणार आहेत.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. दौऱ्यात आढळलेली वस्तुस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबतचे त्यात उल्लेख होता. “आम्ही शक्य ती सर्व मदत तुम्हाला करतो आहोत. मात्र आता परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या कठीण काळात आवश्यकता वाटत असल्यास चर्चेला तयार आहोत” असेही फडणवीसांनी यात म्हटलं होतं.
“संपूर्ण राज्यात रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याचा नीट अंदाज लावून आगामी काळासाठी आजच पुरेशा प्रमाणात बेड्स, तसेच ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची सुविधा असणारे बेडस्ही उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महापालिका, नगरपालिकांच्या वर्गानुसार, तेथे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर राज्य शासनामार्फत तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.” अशी मागणी त्यांनी केली होती.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 17 July 2020 https://t.co/X9ccQRoi0A
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2020
(Devendra Fadnavis Visits New Delhi to meet Amit Shah)