नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…

Amruta Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्याच छत्रछायेखाली ड्रग्ज रॅकेट सुरु होते. यापैकी एका ड्रग्ज पॅडलरने अमृता फडणवीस यांच्या एका गाण्यासाठी वित्तपुरवठा केला होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या...
अमृता फडणवीस आणि नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 10:42 AM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्याच छत्रछायेखाली ड्रग्ज रॅकेट सुरु होते. यापैकी एका ड्रग्ज पॅडलरने अमृता फडणवीस यांच्या एका गाण्यासाठी वित्तपुरवठा केला होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपांवर अमृता यांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आता थोड्याचवेळात देवेंद्र फडणवीस हेदेखील पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण कितपत रंगणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु

समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे.

ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे. निरज गुंडे त्यांच्यामध्ये जाऊन कसा बसतो, का भाजपचे लोक सुटतात. आता ते हेच बोलतील की आम्हाला माहित नव्हतं. पण, त्यांना माहित होतं.

संबंधित बातम्या :

‘या’ ड्रग्ज पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? अमृता फडणवीसांचा फोटो, नवाब मलिकांचा सवाल

नवाब मलिकांचे सर्व आरोप खोटे, क्रांती रेडकर यांचा पुन्हा एकदा दावा

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली; नवाब मलिक ठाम

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.