Sachin Vaze: चेल्यांना हाताशी धरुन उद्योगपतींकडून वसुली, अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत. | Amruta Fadnavis

Sachin Vaze: चेल्यांना हाताशी धरुन उद्योगपतींकडून वसुली, अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
Amruta Fadnavis and uddhav thackeray
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 2:06 PM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या सचिन वाझे प्रकरणावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. ठाकरे सरकार सचिन वाझे (Sachin Vaze) याच्यासारख्या आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आखत आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली. (Amruta Fadnavis take a dig at Thackeray govt over sachin vaze)

अमृता यांनी बुधवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. एकीकडे नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही. तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत, असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांचा जंगलातील जमिनीवर बंगला’

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी अलिबागमधील जमिनीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला होता.

किरीट सोमय्यांच्या या ट्विटला अमृता यांनी रिट्विट करत त्यावर विशेष टिप्पणी केली होती. सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

संबंधित बातम्या:

रोहित पवार म्हणाले, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात, आता अमृता फडणवीस म्हणतात..

Amruta Fadnavis | ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित!

तुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेने प्रमोशन का दिले, किती फायदा करुन दिलात; अमृता फडणवीस म्हणाल्या…

(Amruta Fadnavis take a dig at Thackeray govt over sachin vaze)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.