‘या’ निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश गेला, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 'सीएम फेलोशिप' कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

'या' निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश गेला, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 7:41 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘सीएम फेलोशिप’ कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे (Devendra Fadnavis on CM Fellowship program). याबाबत त्यांनी उद्धव ठाकरेंना सविस्तर पत्र लिहलं आहे. कार्यरत फेलोजचा कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये संपत आहे. मात्र, राज्य सरकारने त्याआधीच या फेलोजच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश गेला आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सीएम फेलोशीप कार्यक्रमाचा मी कधीही राजकीय वापर होऊ दिलेला नाही. फेलोजने नेहमी प्रशासनासोबत काम केलं. या कार्यक्रमातून फेलोजच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावतील आणि शासनालाही त्यांच्या सहभागाचा उपयोग होईल, अशी या कार्यक्रमाची रचना आहे. महाराष्ट्राने हा कार्यक्रम सुरु केला तेव्हा देशात कोठेही असा कार्यक्रम सुरु नव्हता. मात्र, आता पंजाब, हरियाणा, झारखंड, छत्तीसगड, दिल्ली अशा अनेक राज्यांनी असा कार्यक्रम अमलात आणण्यास सुरुवात केली.”

आपल्या नेतृत्वातील सरकारने सीएम फेलोव कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मला समजले. आपण मागील 5 वर्षातील कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा अवश्य आढावा घ्यावा. योग्य बदलासह तो नव्या स्वरुपात अमलात आणावा. ते अधिक संयुक्तिक होईल. सध्या कार्यरत फेलोजचा कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये संपत आहे. मात्र, राज्य सरकारने त्याआधीच या फेलोजच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश जात आहे. किमान त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळावी असं मला आवर्जून वाटते. आवश्यक बदलांसह फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याच्या आणि कार्यरत फेलोजना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करु देण्याच्या माझ्या मागणीचा विचार करावा, असंही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं.

फडणवीस यांनी लिहिलेल्या या दोन पानी पत्रात त्यांनी उद्धव ठाकरेंना या फेलोशिप कार्यक्रमाने झालेल्या परिणामाची आणि त्याच्या उद्देशांचीही माहिती दिली.

Devendra Fadnavis on CM Fellowship program

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.