Devendra Fadnavis: ‘दादांचीही’ नसेल एवढी… बारामती ते मुंबईपर्यंत प्रॉपर्टी घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कुंडली फडणवीसांनी मांडली, मलिक कनेक्शन?

नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही हा अट्टाहास का? त्यांचा राजीनामा न घेतल्यानं सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे फडणवीसांनी या प्रकरणातील एक पेनड्राईव्हही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती सभागृहात दिली.

Devendra Fadnavis: 'दादांचीही' नसेल एवढी... बारामती ते मुंबईपर्यंत प्रॉपर्टी घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कुंडली फडणवीसांनी मांडली, मलिक कनेक्शन?
इसाक बागवान यांच्यावर फडणवीसांचा गंभीर आरोप, मलिकांच्या राजीनाम्याची मागणीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 7:12 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुन्हा एकदा नवाब मलिक (Mahavikas Aghadi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यावेळी फडणवीसांनी निवृत्त डीसीपी इकास बागवान (Isaq Bagwan) यांच्या जमीन व्यवहाराचा दाखला देत त्यात मुंबईतील एका मोठ्या मंत्र्यानं मध्यस्ती केल्याचा आरोप केलाय. महत्वाची बाब म्हणजे या जमीन व्यवहार प्रकरणात दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित व्यक्तीचा समावेश असल्याचा आरोप केलाय. या आरोपानंतर नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही हा अट्टाहास का? त्यांचा राजीनामा न घेतल्यानं सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे फडणवीसांनी या प्रकरणातील एक पेनड्राईव्हही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती सभागृहात दिली.

फडणवीसांचा अजून एक पेनड्राईव्ह

एक तक्रार माझ्याकडे आलीय. आणि त्या तक्रारीचा एक पेनड्राईव्हही माझ्याकडे आलाय. हा पेनड्राईव्ह मी गृहमंत्र्यांना देणार आहे. कारण, याची फॉरेन्सिक चाचणी मी केलेली नाही. त्यामुळे कुणावर थेट आरोप मी लावत नाही. आपल्या मुंबई पोलीस दलातील एक सेवानिवृत्त डीसीपी इसाक बागवान म्हणून आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. त्यांना काही पुरस्कारही मिळाले आहेत. आता त्यांच्या बंधूंनी त्यांच्याबाबत एक तक्रार केलीय. त्यांचं बारामती कनेक्शन आहे पण अजितदादांशी त्यांचा काही संबंध नाही. हे सेवेत असताना मोठ्या प्रमाणात सपत्ती यांनी जमा केली. एकट्या बारामतीत यांनी गट क्रमांक 69 मधील 42 एकर NA जमीन आहे त्यांच्याकडे. दादांचीही एवढी जमीन नसेल. बारामती पासून ते मुंबईतील संपत्तीपर्यंतच्या संपत्तीची माहिती मी तुम्हाला देतो, असं फडणवीस म्हणाले.

इकास बागवान यांच्या जमिनीचा व्यवहार फडणवीसांनी मांडला

मुळात इसाक बागवान यांचे सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम माणिक बागवान आणि चुलत भावजय बिल्किस गुलाब हुसेन बागवान यांच्या नावावर त्यांनी त्या खरेदी केल्या. नोकरीत असताना खरेदी केल्या. नोकरीवरुन निवृत्त झाल्यानंतर यांनी सुरुवातीला फक्त एक अर्ज दिला. त्या आधारे त्यांनी त्या जमिनी नावावर करुन घेतल्या. इतकंच नाही तर इसाक बागवान यांनी कपूर या व्यक्तीला ही जमीन विकली आणि दोन महिन्यात पुन्हा ती परत घेतली. या जमिनी कुणाच्या नावानं घेतल्या होत्या, तर फरीद मोहम्मद अली वेल्डर. हा व्यक्ती कोण तर 2017 मध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे क्राईम ब्रँचने अटक केली तेव्हा त्याने सांगितलं होतं की मी या फरीद मोहम्मद अली वेल्डरला दहा लाख रुपये दिले. फरीद मोहम्मद अली वेल्डरची चौकशी झाल्या झाल्या तो सात दिवसांत मृत्युमुखी पडला, त्यानंतर तो वाचला नाही.

‘मुंबईच्या मोठ्या राजकीय नेत्याची मध्यस्ती’

महत्वाची गोष्टी अशी की 41 लाख रुपयाला फरीद मोहम्मद अली वेल्डरने ही जमीन त्यांच्याकडून विकत घेतली. मजेची गोष्टी अशी की ही जमीन 10 वर्षे नावावर ठेवली आणि आता 30 डिसेंबर 2020 ला ही सगळी जमीन त्या वेल्डरच्या मुलाने इसाक बागवान यांना बक्षीसपत्र करुन दिली. यात सगळ्यात एका राजकीय नेत्याने मध्यस्ती केली. हा पेनड्राईव्ह तुम्हाला देण्यामागे तेच कारण आहे. नसीर बागवानचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. यात कसा तो मुंबईचा मोठा राजकीय नेता बारामतीला गेला, त्याने कशाप्रकारे या सगळ्यात मध्यस्ती केली, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केलाय.

सरकारचा हा अट्टाहास का?

हे सांगण्याचं कारण म्हणजे आज सातत्याने आम्ही सन्माननीय मंत्री नवाब मलिक यांच्यासंदर्भातील मुद्दा आम्ही मांडतोय. मागच्यावेळी हायकोर्टात केस होती आणि हायकोर्टाने निर्णय दिला. माननीय मंत्रीमहोदय तुम्ही जे मुद्दे सभागृहात मांडले ते सगळे मुद्दे दुसऱ्या दिवशी हायकोर्टाने फेटाळले. असं असताना एवढी जिद्द का? एखादं दुसरं प्रकरण असतं तर आम्ही त्याचा पाठपुरावा कमी केला असता. पण देशाच्या सुरक्षेशी संबंधित आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून अशाप्रकारे मनी लॉन्ड्रिंग करुन अशाप्रकारे जमिनी घेतल्यानंतर, ईडीने अटक केल्यानंतर, ट्रायल कोर्टाने त्यांना कस्टडी दिल्यानंतर, हायकोर्टानेही ती नक्की केल्यानंतर हा अट्टाहास का आहे की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतोय, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

Devendra Fadnavis : फडणवीसांनी BMC तील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला! फडणवीसांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर

Devendra Fadnavis : मुंबई मेली तरी चालेल, ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची न संपणारी यादी फडणवीसांनी वाचली, मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी?

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.