AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातील नवा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ दाखवणारे धैर्यशील माने शिवसेना प्रवक्तेपदापासून दूर

आपल्या तडफदार भाषणांनी धैर्यशील माने यांनी यापूर्वी अनेक सभा गाजवल्या आहेत (Dhairyasheel Mane no more Shivsena Spokesperson)

राजकारणातील नवा 'कोल्हापुरी पॅटर्न' दाखवणारे धैर्यशील माने शिवसेना प्रवक्तेपदापासून दूर
हातकणंगले खासदार धैर्यशील माने
| Updated on: Mar 31, 2021 | 3:42 PM
Share

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात शिवसेनेत प्रवेश केलेल्या तिघा जणांना प्रवक्तेपद देण्यात आले आहे. मात्र चौघा नेत्यांचा नव्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. राजकारणातील नवा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ देशाला दाखवणारे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) प्रवक्तेपदापासून दूर राहिले आहेत. (Dhairyasheel Mane not in the new list of Shivsena Official Spokesperson)

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.

कोण आहेत धैर्यशील माने?

धैर्यशील माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधलं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मैदानात उतरलेले माजी खासदार राजू शेट्टी यांचा शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. धैर्यशील माने यांनी तब्बल 93 हजार 785 मतांनी विजय मिळवला होता.

विशेष म्हणजे धैर्यशील माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत राजकारणातील नवा कोल्हापुरी पॅटर्न देशाला दाखवून दिला होता. मानेंनी थेट राजू शेट्टी यांचं घर गाठून त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद घेतला होता.

वक्तृत्वशैलीसाठी प्रसिद्ध

खरं तर खासदार धैर्यशील माने हे वक्तृत्वशैलीसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या तडफदार भाषणांनी धैर्यशील माने यांनी यापूर्वी अनेक सभा गाजवल्या आहेत. 2019 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर इस्लामपुरातील त्यांचं भाषण विशेष चर्चेत राहिलं होतं. कारण उभ्या पावसात धैर्यशील माने यांनी न थांबता भाषण केलं होतं. जोरदार पावसाला जणू धैर्यशील माने यांनी धारदार भाषणाने उत्तर दिलं होतं.

दुसरीकडे, एकच उल्हास, बाकी सब खल्लास, अशी गर्जना करत विधानसभा निवडणुकांच्या वेळी धैर्यशील माने यांनी शिरोळमधील शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठीही खणखणीत भाषण केलं होतं.

शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी) सुनील प्रभू – आमदार (मुंबई) प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे) भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी) अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी) मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी) किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई) शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी) डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी) किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी) संजना घाडी (नवीन वर्णी) आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी) (Dhairyasheel Mane not in the new list of Shivsena Official Spokesperson)

नव्या यादीत कोणाला स्थान नाही?

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर) डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

संबंधित बातम्या :

शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, संजय राऊतांसह ‘त्या’ खासदाराला मुख्य प्रवक्तेपद, 16 जण कोण?

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसमधून शिवसेनेत, आता थेट प्रवक्तेपदाची बक्षिसी

पूरग्रस्तांचं ओझं खांद्यावर, खासदार धैर्यशील मानेंनी ट्रकमधील पोती स्वतः उतरवली

(Dhairyasheel Mane not in the new list of Shivsena Official Spokesperson)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.