वाढीव वीज बिलावर एकत्र येऊन तोडगा काढायला हवा, मोर्चे नाही, खा. धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींना टोला
कोरोना काळात मोर्चे काढणे चुकीचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन वीज बिलाचा प्रश्न सोडवला पाहिजे, असा टोला शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीचं नाव घेता लगावला.
इचलकरंजी : वाढीव वीज बिलाविरोधात (Excessive Electricity Bill) शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आंदोलन केलं होतं. राजू शेट्टींच्या आंदोलनाला आज पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार धैर्यशील माने (Shivsena MP Shairyasheel Mane) यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘कोरोना काळात मोर्चे काढणे चुकीचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन वीज बिलाचा प्रश्न सोडवला पाहिजे’, असा टोला त्यांनी राजू शेट्टीचं नाव घेता लगावला. (Dhairyasheel Mane Slam Raju Shetti)
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यामध्ये चांगलं काम करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये मोर्चे आंदोलने न करता सगळ्यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. सहानभूती मिळवण्यासाठी काही जण आंदोलने करत आहे”, असा टोला माने यांनी लगावला.
“महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षमपणे राज्य चालवत आहे. कोरोना माहामारीच्या काळामध्ये अतिशय समंजसपणे राज्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी हाताळली. वाढीव वीज बिलावरुन भाजप आंदोलन करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असताना आंदोलने मोर्चे काढू नयेत”, असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी केलं.
वीज बिलाचे पैसे आम्ही भरणार नाही : राजू शेट्टी
आज मंगळवारी इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयावर स्वाभिमानीचा मोर्चा धडकला. लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाचे पैसे आम्ही भरणार नाही. आता सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी आमच्याकडून वीज बिलाची वसूली करुनच दाखवावी, असं जाहीर आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलं.
राज्य सरकारने वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वीज बिलं माफ केली नाहीत तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक भागांतील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना वीजेची भरमसाट बिले आली होती. सरकारने दिलासादायक निर्णय घेऊन सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असं शेट्टी म्हणाले. (Dhairyasheel Mane Slam Raju Shetti)
संबंधित बातम्या
वीज बिल माफीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा, वीज ग्राहकांनाही सहभागी होण्याचं राजू शेट्टींचं आवाहन
Raju Shetti | राज्य सरकारने बिल माफ करावं, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा: राजू शेट्टी
वाढीव वीजबिलाविरोधात मनसेची पोस्टरबाजी; पोलीस, बेस्ट प्रशासनाने होर्डिंग्ज हटवले